गोंडपीपरि-(सुरज माडुरवार)
ग्रामीण भागातील विद्यार्थी वाचनालयाच्या माध्यमातून विकासाच्या मुख्य प्रवाहात येतील वढोलीच्या विकासाठी नेहमीचं कटिबद्ध असू असे प्रतिपादन वढोली येथील सार्वजनिक वाचनालयाच्या library भूमीपूजनाप्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी केले व केले.
आमदार धोटे यांनी वाचनालयासाठी २० लक्ष निधी उपलब्ध करून दिला सोबतच चौदाशे मीटर पांदण रस्त्यासाठी ३५ लक्ष निधी उपलब्ध करून दिला आहे .वढोली व परिसरातील विद्यार्थ्यांनी वाचनालयाचा लाभ घ्यावा असे मत त्यांनी व्यक्त केले .वढोलीच्या विकासाठी सदैव कटिबद्ध राहु असा शब्द यावेळी आमदारांनी उपस्थितांना दिला.यावेळी सरपंच राजेश कवठे,उपसरपंच बहिणाबाई देवाडे,ग्रा पं सदस्य संदिप पौरकार,सुवर्णा पोलोजवार,शिला खरबनकर,सुरेंद्र मडपल्लीवार,ग्रामसेवक विनोद झिले,तृप्ती चुणारकर,काँग्रेस तालुका अध्यक्ष तुकाराम झाडे,शहर अध्यक्ष देवेंद्र बट्टे,कार्याध्यक्ष निलेश संगमवार,महेंद्र कुणघाटकर,उपसरपंच हरिदास मडावी यांच्यासह वढोलीतील शेकडो नागरिकांची व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.