• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

लोहखनिजाच्या संपत्तीतही मुर्रेवाडा अंधारात; रस्त्यासाठी जीवघेणा प्रवास

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
August 23, 2026
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
Spread the Information

गडचिरोली: जिल्ह्यातील एटापल्ली तालुका लोहखनिजाच्या मोठ्या साठ्यांसाठी ओळखला जातो. सुरजागड पहाडावर मोठ्या प्रमाणात लोहखनिजाचे उत्खनन सुरू आहे. या खनिजातून शासनाला मोठ्या प्रमाणात रॉयल्टी मिळत असतानाच गडचिरोलीला स्टील हब बनविण्याची घोषणा मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मात्र, याच एटापल्ली तालुक्यातील दुर्गम गावांमध्ये आजही मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे वास्तव समोर आले आहे.
एटापल्ली तालुक्यातील मुर्रेवाडा गाव त्याचेच उदाहरण आहे. स्वातंत्र्याला ८० वर्षे पूर्ण होत आली, तरी या गावापर्यंत अद्याप पक्का रस्ता आणि वीज पोहोचलेली नाही. त्यामुळे गावातील नागरिकांना आजही अंधारात आणि खडतर रस्त्यावर जीवन जगावे लागत आहे.

RelatedPosts

स्मार्ट मीटरविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अल्टिमेटम;सात दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा

‘उलगुलान’ उपक्रमाची मोठी झेप; गडचिरोलीतील सात विद्यार्थ्यांची वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी निवड

गडचिरोलीची प्रारूप मतदार यादी जाहीर; ७.३८ लाख मतदारांचा समावेश

गर्देवाडा ग्रामपंचायत आंतर्गत येणारा मुर्रेवाडा गाव येथून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर आहे. मात्र, या सहा किलोमीटरच्या अंतरासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. रस्ता कच्चा असल्याने उन्हाळ्यात धूळ, तर पावसाळ्यात चिखल आणि खड्ड्यांमधून प्रवास करावा लागतो.
पावसाळ्यात नदी-नाले तुडुंब भरल्याने परिस्थिती आणखी गंभीर होते. त्यामुळे रुग्ण, गर्भवती महिला, विद्यार्थी आणि वृद्ध नागरिकांना या मार्गावरून प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागतो. आपत्कालीन परिस्थितीत गावापर्यंत मदत पोहोचवणेही आव्हान ठरत आहे.

लोहखनिजातून रॉयल्टी, पण गावात विकासाचा अभाव

एटापल्ली तालुक्यातून मोठ्या प्रमाणात लोहखनिजाचे उत्पादन होत आहे. या माध्यमातून शासनाला मोठ्या प्रमाणात रॉयल्टी मिळते. या रॉयल्टीच्या माध्यमातून तालुक्यातील दुर्गम भागातील रस्ते, वीज आणि इतर मूलभूत सुविधा मजबूत करण्यासाठी विकासकामांना गती देता येऊ शकते. मात्र, मुर्रेवाड्यासारख्या गावांची परिस्थिती पाहता या विकासाचा लाभ दुर्गम भागापर्यंत किती पोहोचला, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

स्टील हबच्या घोषणेसोबत दुर्गम गावांचाही विकास होणार का?

एकीकडे गडचिरोलीला स्टील हब बनविण्याची तयारी सुरू आहे. लोहखनिजाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. मात्र, औद्योगिक विकासासोबत दुर्गम गावांमधील नागरिकांच्या मूलभूत गरजांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.मुर्रेवाड्यासारख्या गावांमध्ये आजही वीज आणि पक्का रस्ता उपलब्ध नसणे ही विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे. लोहखनिजाच्या संपत्तीने एटापल्लीची अर्थव्यवस्था मजबूत होत असताना या संपत्तीचा काही भाग दुर्गम गावांच्या विकासासाठी वापरला जाणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

मुर्रेवाड्यासह गर्देवाडा ग्रामपंचायत परिसरातील दुर्गम गावांचा तातडीने सर्वेक्षण करून पक्का रस्ता, वीज आणि आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आता जोर धरत आहे. लोहखनिजाच्या माध्यमातून देशाच्या विकासात योगदान देणाऱ्या या भागातील नागरिकांच्या जीवनात विकासाचा सूर्योदय कधी होणार, हा खरा प्रश्न आहे.

Previous Post

भामरागडमधील पूरबाधित ५०० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

Next Post

लोहखनिजाच्या संपत्तीतही मुर्रेवाडा अंधारात; रस्त्यासाठी जीवघेणा प्रवास

Mahesh Gundetiwar

Mahesh Gundetiwar

Next Post
लोहखनिजाच्या संपत्तीतही मुर्रेवाडा अंधारात; रस्त्यासाठी जीवघेणा प्रवास

लोहखनिजाच्या संपत्तीतही मुर्रेवाडा अंधारात; रस्त्यासाठी जीवघेणा प्रवास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

September 1, 2026
स्मार्ट मीटरविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अल्टिमेटम;सात दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा

स्मार्ट मीटरविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अल्टिमेटम;सात दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा

September 1, 2026
‘उलगुलान’ उपक्रमाची मोठी झेप; गडचिरोलीतील सात विद्यार्थ्यांची वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी निवड

‘उलगुलान’ उपक्रमाची मोठी झेप; गडचिरोलीतील सात विद्यार्थ्यांची वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी निवड

September 1, 2026
गडचिरोलीची प्रारूप मतदार यादी जाहीर; ७.३८ लाख मतदारांचा समावेश

गडचिरोलीची प्रारूप मतदार यादी जाहीर; ७.३८ लाख मतदारांचा समावेश

August 31, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1