चंद्रपूर :- अव्वल कारकून संवर्गातुन नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नती प्रक्रिया मागील दोन वर्षापासुन थांबली आहे. तसेच महसुल सहायकाचे पदे भरण्यात आलेली नाही. त्यामूळे सदर पदोन्नती प्रक्रिया पुर्ण करुन महसुल सहायकाचे रिक्त पदे भरण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांना केली आहे.या संदर्भात आजच संबधित विभागाची बैठक घेत निर्णय घेणार असल्याचे आश्वासन ना. बाळासाहेब थोरात यांनी आ. जोरगेवार यांना दिले आहे.
आज बुधवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुबंई येथील मंत्रालयात महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेत सदर मागणी बाबत सविस्तर चर्चा केली. या मागणी करिता चंद्रपूरात महसुल विभागाच्या कर्मचा-र्यांचे सुरु असलेल्या आंदोलना बाबतही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी ना. बाळासाहेब थोरात यांना माहिती दिली.
विविध मागण्यांसाठी चंद्रपूरात सुरु असलेल्या महसूल कर्मचा-र्यांच्या आंदोलनाला काल मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट देत कर्मचा-र्यांच्या मागण्या समजून घेतल्या होत्या. यावेळी कर्मचा-र्यांच्या मागण्या महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यापूढे मांडण्याचे आश्वासन आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोलक कर्मचा-र्यांना दिले होते. त्यांनतर आज बुधवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुबंई येथील मंत्रालयात बाळासाहेब थोरात यांची भेट घेत महसूल कर्मचा-र्यांच्या मागण्या त्यांच्या पूढे ठेवल्यात.
नागपूर, कोकण, नाशिक तसेच इतर विभागाचे अव्वल कारकून संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नतीचे प्रस्ताव मंत्रालयात दिड ते दोन वर्षापासून प्रलंबित ठेवण्यात आले आहे. तसेच महसूल विभागातील सहायकाची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त ठेवण्यात आली आहे. परिणामी कर्मचा-र्यांचा अभाव निर्माण झाला असून एका महसूल सहायकाला दोन ते तिन संकलनाचा कार्यभार सांभाळावा लागत असल्याची बाब यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या लक्षात आणून दिली. तसेच महसूल कर्मचा-र्यांच्या मागण्या न्यायक असून त्या सोडविण्यात यावा अशी मागणी केली आहे. यावेळी सदर मागणी संदर्भात आमदार किशोर जोरगेवार यांची महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून या संदर्भात आजच बैठक घेत सदर मागण्या सोडविण्याच्या दिशेने प्रयत्न केल्या जातील असे आश्वासन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आ. जोरगेवार यांना दिले आहे.