• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

दुर्गम नेलगुंडा येथे शाळा व विकास कामांसाठी हेमलकसा प्रकल्पाला शासकीय जमीन मंजूर

महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
June 12, 2026
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
दुर्गम नेलगुंडा येथे शाळा व विकास कामांसाठी हेमलकसा प्रकल्पाला शासकीय जमीन मंजूर
Spread the Information

गडचिरोली: भामरागड तालुक्यातील मौजा नेलगुंडा या दुर्गम भागात शाळा व इतर विकासात्मक उपक्रमांसाठी शासकीय जमीन मंजूर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विशेष पुढाकारामुळे हा निर्णय मार्गी लागला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
महसूल व वन विभागाने ११ जून २०२६ रोजी जारी केलेल्या शासन आदेशानुसार मौजा नेलगुंडा, तालुका भामरागड येथील सर्वे क्रमांक ९३ मधील ०.२० हेक्टर आर शासकीय जमीन शाळा आणि इतर विकासात्मक उपक्रमांसाठी महारोगी सेवा समिती, वरोरा यांना मंजूर करण्यात आली आहे. या संदर्भात पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी शासनाकडे मागणी केली होती.
गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागात लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासी समाजासाठी शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक विकासाचे कार्य गेल्या अनेक दशकांपासून सुरू आहे. नेलगुंडा परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावे, शाळेच्या पायाभूत सुविधा वाढाव्यात आणि विकासात्मक उपक्रमांना गती मिळावी, यासाठी ही जमीन आवश्यक होती.
या मागणीची दखल घेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित विभागांशी सातत्याने पाठपुरावा केला. विभागीय आयुक्त नागपूर आणि अहेरी येथील महसूल प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावांचा सकारात्मक विचार करून शासनाने अखेर जमीन मंजुरीचा निर्णय घेतला.
या निर्णयामुळे नेलगुंडा आणि परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असून, लोकबिरादरी प्रकल्पाच्या विविध विकासात्मक उपक्रमांना मोठी चालना मिळणार आहे. दुर्गम भागातील शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी हा निर्णय मैलाचा दगड ठरणार असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आणि संवेदनशील भूमिकेबद्दल त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारामुळे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पाठबळामुळे आदिवासी भागातील विकासाच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेल्याचे मानले जात आहे.

RelatedPosts

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

गॅस संपला, चूल पेटली; डुम्मेच्या शाळेच्या स्वयंपाकघरात धुराचा त्रास!

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन दुर्गम व आदिवासी भागांतील शिक्षण आणि विकासाला प्राधान्य देत आहे. महारोगी सेवा समितीने अनेक वर्षांपासून समाजहितासाठी केलेल्या कार्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला असून नेलगुंडा आणि परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध होतील तसेच सामाजिक विकासाच्या विविध उपक्रमांना गती मिळेल.
— चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री

Previous Post

सोमनाथ रोडवरील रेतीची जड वाहतूक तात्काळ बंद करण्याची भाजपची मागणी

Next Post

सीआरपीएफ कॅम्पमध्ये भव्य रक्तदान शिबिर;कमांडंटांनी स्वतः रक्तदान करत केले दूसऱ्यांना प्रेरित

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

September 17, 2026
कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

September 17, 2026
आदिवासी योजनांची माहिती गावागावात पोहोचणार; सेवा संकल्प अभियानाला सुरुवात

आदिवासी योजनांची माहिती गावागावात पोहोचणार; सेवा संकल्प अभियानाला सुरुवात

September 17, 2026
गॅस संपला, चूल पेटली; डुम्मेच्या शाळेच्या स्वयंपाकघरात धुराचा त्रास!

गॅस संपला, चूल पेटली; डुम्मेच्या शाळेच्या स्वयंपाकघरात धुराचा त्रास!

September 17, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1