अहेरी: प्राणहिता वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, देवलमारी येथील नव्या आधुनिक इमारतीचे भव्य लोकार्पण झाले. अहेरी विधानसभा क्षेत्राचे आ. डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते या सुसज्ज कार्यालयाचे उद्घाटन झाले, ज्यामुळे उपस्थितांकडून टाळू वाजवून आनंद व्यक्त करण्यात आला.
या उत्साही सोहळ्याला गडचिरोली वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक जी. पी. नरवने, सिरोंचा वन विभागाचे उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी, उपविभागीय वनअधिकारी विष्णुवर्धन रेड्डी, अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रविंद्र बाबा आत्राम आणि सामाजिक कार्यकर्ते अरुण मुक्कावार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
जैवविविधतेने नटलेल्या प्राणहिता परिसरात वनसंपदा, औषधी वनस्पती आणि वन्यजीवांचे संरक्षण आता अधिक मजबूत होणार असून हे नवे कार्यालय फक्त प्रशासकीय केंद्र नसून, वनरक्षकांसाठी ‘हरित तटस्थबंदी’सारखे ठरणार आहे.एवढेच नव्हेत अवैध वृक्षतोड, शिकार व अतिक्रमणावर लगाम लागणार तसेच जनजागृती, वृक्षारोपण, पर्यावरण मोहिमा व शाश्वत विकास योजनांना चालना मिळणार आहे.
उद्घाटनानंतर आ. डॉ. आत्राम यांच्या नेतृत्वात वृक्षारोपण उपक्रम झाला. “झाडे लावा, पर्यावरण वाचवा” असा संदेश देत त्यांनी उपस्थितांना आवाहन केले. मान्यवरांसह ग्रामस्थांनीही सहभाग घेऊन हरित क्रांतीला उभारी दिली.अगोदर प्राणहिता वनपरिक्षेत्र कार्यालय रेपनपल्ली येथे होता आता देवलमरी येथे नूतन कार्यालयातून कारभार चालविले जाणार आहे. हे कार्यालय वन विभाग व स्थानिकांच्या समन्वयाचे नवे केंद्र बनेल, ज्यामुळे पर्यावरण संरक्षणाची चळवळ अधिक तळागाळापर्यंत पोहोचेल अशी आशा आहे.













