• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

…अखेर उघडकीस आले ‘त्या’ भयावह हत्याकांडाचे रहस्य;ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
January 22, 2026
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
…अखेर उघडकीस आले ‘त्या’ भयावह हत्याकांडाचे रहस्य;ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!
Spread the Information

नागेपल्ली येथील आर. डी. एजंट रवींद्र नामदेव तंगडपल्लीवार (वय ४९) यांच्या निर्घृण हत्याकांडाचा उलगडा अहेरी पोलिसांनी केला आहे.

RelatedPosts

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

अहेरी: नागेपल्ली येथील आर. डी. एजंट रवींद्र नामदेव तंगडपल्लीवार (वय ४९) यांच्या निर्घृण हत्याकांडाचा उलगडा अहेरी पोलिसांनी केला असून,आरोपीने सोन्याच्या चैनीच्या लोभातून हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे. संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवणाऱ्या या घटनेने समाज मूकपणे सुन्न झाला आहे. आरोपी समय्या मलय्या सुंकरी (३७, रा. मुद्दिगुडम, ता. अहेरी) याला मंगळवार २० जानेवारीला अटक करून बुधवार २१ जानेवारीला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला २८ जानेवारी पर्यंत म्हणजेच ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, आता गुन्हेगारी साहित्याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

अहेरी उपविभागातील आलापल्ली हे मध्यवर्ती शहर असले तरी येथे घडलेल्या या क्रूरतेच्या घटनेने सर्वत्र थरार उडाला. रविवारी १८ जानेवारी रोजी आरोपी समय्या सुंकरीने रवींद्र तंगडपल्लीवार यांना आर. डी. देण्याच्या बहाण्याने फोन करून बोलावले. नागेपल्लीहून आलापल्लीत पोहोचल्याची माहिती मिळताच, आरोपीने त्यांना आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील पुलावर बोलावले. “आधी दारू पार्टी करू” असे सांगून त्याने त्यांना नागमंदिराजवळील जंगल परिसरात नेले.जंगल गाठताच आरोपीने “दारूची बाटली रस्त्यावर पडली” अशी चूक सांगून दुचाकी मागे घेण्याचे सांगितले. मग मागूनच तीक्ष्ण हत्याराने डोक्यावर जोरदार वार केला. खाली पडलेल्या रवींद्रवर सपासप वार करून त्याने त्यांना रक्ताच्या थारोळ्यात सोडले आणि गळ्यातील सोन्याची साखळी आणि बोटातील अंगठी लंपास करून पळून गेला. ही क्रूरता पाहून तंगडपल्लीवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला, तर समाजातून संतापाची लाट उसळली.

सत्तूरने केले निर्घृण वार, बोटे गळून पडली

पोलिस तपासात असे उघड झाले की, आरोपीने सत्तूर या धारदार हत्याराचा वापर केला. रवींद्र यांनी हाताने प्रतिकार केल्याने सत्तूरचे वार बोटांवर लागले आणि पाच बोटे गळून पडली. हा भयावह अनुभव ऐकून सर्वांचा थरकाप उभा उडाला. गुन्ह्यानंतर आरोपीने दुचाकी, सत्तूर आणि इतर साहित्याची विल्हेवाट लावली. सध्या लूटमारीसाठी हत्या केल्याची कबुली असली तरी पोलिसांचा पुढील तपासात आणखी काळे पैलू उघड होऊ शकतात.

विशेष म्हणजे या घटनेनंतर अहेरी पोलिसांनी तात्काळ तपासचक्रे फिरवली. रवींद्र तंगडपल्लीवार यांच्यासोबत आरोपीचा भ्रमणध्वनीवर झालेला अखेरचा संपर्कावरून संशयित समय्या सुंकरीला ताब्यात घेऊन विचारपूस केली तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सात दिवसांची कोठडी मिळाल्याने आता लंपास केलेले सोने, दुचाकी आणि हत्याराचा उलगडा होणार आहे.”तपास अजून सुरू असून आणखी पुरावे सापडण्याची शक्यता आहे.मात्र केवळ सोन्यासाठी झालेल्या इतक्या क्रूर हत्येने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे. नागरिकांमधून या घटनेचा तीव्र निषेध केला जात आहे.

Previous Post

जप्त ट्रॅक्टरवर दंड कमी करण्यासाठी घेतली १० हजारांची लाच; क्षेत्र सहायक अडकला एसीबीच्या जाळ्यात

Next Post

आज माघ शुक्ल चतुर्थी अर्थातच गणेश जयंती महोत्सव.

Mahesh Gundetiwar

Mahesh Gundetiwar

Next Post
आज माघ शुक्ल चतुर्थी अर्थातच गणेश जयंती महोत्सव.

आज माघ शुक्ल चतुर्थी अर्थातच गणेश जयंती महोत्सव.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1