नागपुर । प्रतिनिधी – म्हाडा प्राधिकरणामध्ये अभियंता संवर्गातील रिक्त जागा खात्यातर्गत सेवाजेष्ठता समिती दिर्घ काळ प्रलंबित आहे,त्यामुळे पदोन्नतीसाठी मागील अनेक वर्षापासून रिक्त आहेत त्या भरण्यात याव्यात या लक्षवेधी सुचनेवर निर्देश देताना गृनिर्माण विभागाच्या रिक्त जागा ६ आठवड्यात भरण्यात याव्यात असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.
विधानसभेत काँग्रेसचे अमिन पटेल यांनी या संबधीची लक्षवेधी सूचना मांडली होती. यावर बोलताना त्यांनी सांगितले की, पदोन्नती प्रक्रीया सेवा जेष्ठतेनूसार २०२२ पासून पदोन्नती, पात्रता, जेष्ठता व सेवानोंदीचे सर्व निकष पुर्ण झाले आहेत.तरी सुद्धा खात्यातंर्गत सेवाजेष्ठता समितीची प्रक्रीया वेळेत झालेलीा नाही. त्यामुळे म्हाडा या गृहनिर्माण विभागात कर्मचाऱ्यांचा आधीच तुटवडा आहे.अशातच या संवर्गातील अनेक जागा रिक्त आहेत. रिक्त जागा भरण्याची प्रक्रीया कधी पुर्ण होणार असा सवाल यावेळी त्यांनी सरकारला केला.
भाजपचे योगेश सागर यांनी आता म्हाडा हे प्राधिकरण आहे त्यामुळे आकृतीबंध कधी तयार होणार असा प्रश्न विचारला. यावर उत्तरादाखल बोलताना या विभागाचे प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी रिक्त पदांचा प्रश्न सर्वच विभागात प्रलंबित आहे मात्र या विभागाशी संबधीत अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या सर्व प्रकारे आढावा घेऊन त्याचा अभ्यास करून निर्ण घेण्यात य्ईल असे सांगितले. मात्र उपस्थित सदस्यांनी या संबधीचे प्रश्न विचारता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गृह निर्माण विभागातील रिक्त जागा ६ महिन्यात भरण्याची प्रक्रिया पुर्ण करण्याचे निर्देश दिले.
—00—













