• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

दोन राज्यांच्या समन्वयातून नक्षलवादाचे उच्चाटन शक्य : डॉ. छेरिंग दोरजे

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
November 23, 2025
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
दोन राज्यांच्या समन्वयातून नक्षलवादाचे उच्चाटन शक्य : डॉ. छेरिंग दोरजे
Spread the Information

गडचिरोली : नक्षलवादावर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन्ही राज्यांमध्ये सुसंवाद आणि संयुक्त कारवाया मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागात पोलिस मदत केंद्रे आणि पोलिस ठाणी उभारण्यात येत आहेत. अबूझमाड सीमेजवळ उभारलेल्या फुलनार (गुंडुरवाही केंद्र) पोलिस मदत केंद्रामुळे या दोन राज्यांमधील समन्वय वाढेल आणि नक्षलवाद संपुष्टात येण्यास मोठी चालना मिळेल, असा विश्वास अप्पर पोलिस महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे यांनी व्यक्त केला. ते भामरागड तालुक्यातील फुलनार येथील पोलिस मदत केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

RelatedPosts

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

डॉ. दोरजे पुढे म्हणाले की, गेल्या दोन वर्षांत गडचिरोली पोलिस दलाने अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात आठ नवीन पोलिस ठाणी उभारली आहेत. आता अबूझमाडच्या प्रवेशद्वारावर उभा राहिलेला हा मदत केंद्र स्थानिक नागरिकांसाठी विकासाचा नवा टप्पा ठरेल. अशा केंद्रांमुळे केवळ पोलिस कारवाया प्रभावी होत नाहीत, तर त्या माध्यमातून दुर्गम भागात शांतता, विकास आणि रोजगाराच्या संधीही निर्माण होतात. गेल्या पाच वर्षांत गडचिरोली जिल्ह्यातील एकाही तरुणाने नक्षल चळवळीत प्रवेश केला नाही, हे या कार्याचे उत्तम उदाहरण आहे.

स्थानिक आदिवासींना शिक्षण, आरोग्य, इंटरनेट आणि अभ्यासिकेच्या सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा मानस असल्याचेही डॉ. दोरजे यांनी सांगितले. पोलिस अधिकाऱ्यांना स्थानिक लोकांशी संवेदनशीलतेने वागण्याचे आणि त्यांच्या अडचणींवर मदत करण्याचे निर्देश त्यांनी दिले. “2003 मध्ये जेव्हा मी वांगेतुरी परिसरात पेट्रोलिंग करायचो, तेव्हा या भागात अबूझमाडचाच जंगलपट्टा दिसायचा. आज त्या ठिकाणी उभारलेले पोलिस ठाणे म्हणजे विकासाचे प्रतिक आहे,” असे ते म्हणाले.

या कार्यक्रमाला उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ अजय कुमार शर्मा, जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, कमांडंट (सीआरपीएफ 37 बटालियन) दाओ इंजीरकन कींडो, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक सत्य साई कार्तिक, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी, सहाय्यक पोलिस अधीक्षक अनिकेत हिरडे, उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते, तसेच फुलनार (गुंडुरवाही) मदत केंद्राचे प्रभारी सपोनि युवराज घोडके आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

फक्त एका दिवसात उभारले केंद्र

भामरागडपासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावरील गुंडुरवाही या दुर्गम गावापर्यंत पोहोचण्यासाठी पक्का रस्ता नाही. पावसाळ्यात या भागाचा संपर्क पूर्णपणे तुटतो. अशा कठीण परिस्थितीत पोलिस जवानांनी गेल्या काही दिवसांत आठ किलोमीटरचा कच्चा रस्ता तयार करून वाहनांची ये-जा शक्य केली. जवळपास 1,050 जवानांनी 4 जेसीबी, 7 ट्रेलर, 2 पोकलेन आणि 25 ट्रक यांच्या मदतीने फक्त एका दिवसात पोलिस मदत केंद्र उभे केले. केंद्रामध्ये 12 पोर्टा केबिन, जनरेटर शेड, पिण्याच्या पाण्यासाठी आरओ प्लांट, स्वच्छतागृहे, सुरक्षा भिंत (मॅक वॉल), बी पी मोर्चा आदी सुविधा पुरवण्यात आल्या.

Previous Post

गडचिरोलीत मंत्री बावनकुळे म्हणाले: “मी स्टार प्रचारक आहे, मग हिशोब कशाला?”

Next Post

दुचाकीच्या टाकीत बाटल्या, जॅकेटमध्ये निपा;दारूबंदी गडचिरोली जिल्ह्यात “कल्पकतेची नशा”

Mahesh Gundetiwar

Mahesh Gundetiwar

Next Post
दुचाकीच्या टाकीत बाटल्या, जॅकेटमध्ये निपा;दारूबंदी गडचिरोली जिल्ह्यात “कल्पकतेची नशा”

दुचाकीच्या टाकीत बाटल्या, जॅकेटमध्ये निपा;दारूबंदी गडचिरोली जिल्ह्यात "कल्पकतेची नशा"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

September 17, 2026
भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

September 17, 2026
‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

September 17, 2026
कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

September 17, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1