मलकापूर (प्रतिनिधी) :-आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर पुन्हा एक निवारा शोधावा लागणे ही खरंतर दुर्दैवाची बाब आहे पण अशा परिस्थितीमध्ये एक हक्काचे घर निवारा उपलब्ध करून देणारे श्रीनाथ वृद्धाश्रम ला जाणीवची भेट दि. १६ मार्च रोज बुधवार रोजी जाणीव बहुउद्देशीय फाउंडेशन मलकापूर या संस्थेचे वतीने श्रीनाथ वृद्धाश्रम दहिगाव ता.तेल्हारा जि.अकोला येथे गहू १ क्विंटल, तांदूळ २५ किलो, चणे ५ किलो, तेल ५ लिटर, फळे आणि किराणा किट (टूथब्रश, टूथपेस्ट, साबण, पावडर इत्यादी) जीवनावश्यक वस्तुचे वाटप करण्यात आले.
तसेच श्रीनाथ वृद्धाश्रमातील अबालवॄध्दाशी हितगुज साधुन संवाद साधला, याप्रसंगी जाणीव बहुउद्देशीय फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रांजलीताई धोरण, सचिव मनोजकुमार यादव, पत्रकार गणेश वाघ, सर्वश्री सदस्य, सचिन ढोन, सतिश भिसे, रोशनी कथने, सभापती यादव, गणेश कोळी, तसेच श्रीनाथ वृद्धाश्रमचे संचालक, विजयकुमार धरमकर, सुरेंद्र सोळके, मोहन सरदार, अथर्व धरमकर, सौ.लताताई मोगरे, अनिताताई निमकर्डे, संचालिका जयश्रीताई धरमकर, उपस्थित होते. या मदतीसाठी जाणीव सदस्य सतीश भिसे, अभिजीत वाघमारे, संतोष दिघे, योगेश वर्मा, विलास जूनारे, मिलिंद हिरोळे, निलेश वाघ, पवन रायपुरे, श्रीकांत नवलाखे, शिवा कडूकर, विशाल इंगळे, गणेश वाघ, मनोज यादव, दिपक मोरे, यांचे योगदान लाभले. एकाच वेळी अनेक आजी-आजोबांची भेट झाली आणि आशीर्वाद सुद्धा लाभले आणि नकळतच एक जबाबदारी अजून वाढली. जाणीव कडून जमेल ती भेट नेहमीच श्रीनाथ ला पाठवला जाईल असे आश्वासन देत भरून आलेल्या डोळ्यांनी आणि असंख्य विचार डोक्यात घेऊन निरोप घेतला.
जाणीव कडून श्रीनाथ वृद्धाश्रम मदतीसाठी आवाहन करण्यात येते की, कोरोनामुळे मदतीचा ओघ कमी झाल्याने वृद्धाश्रम संकटात आल्याचे चित्र सध्या राज्यभरात पहायला मिळत आहे. वृद्धाश्रमांना मदत करणाऱ्यांमध्ये मध्यमवर्गीयांची संख्या अधिक आहे. सध्या तेच अडचणीत असल्यामुळे त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा करणे चुकीचे आहे. पण उच्च उत्पन्न गटातील व्यक्तींनी स्वतःची सामाजिक जबाबदारी ओळखून आश्रमांना मदत केल्यास निराधारांच्या पोटात सुखाचे दोन घास जातील. सोशल मीडिया आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून जाणीव बहुद्देशीय फाऊंडेशन अशा लोकांना मदतीसाठी वेळोवेळी आवाहन करते. चला तर मग एक मदतीचा हात आजी आजोबा साठी देऊ या अशी प्रतिक्रिया जाणीव फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्रांजलीताई धोरण यांनी केली आहे.