गोंडपिपरी-(सुरज माडुरवार)
बालकल्याण विभागातर्फे ‘तरंग सुपोषित महाराष्ट्राचा’ या उपक्रमा अंतर्गत विविध पोषण ,आरोग्य व बाळाचा सर्वांगिक विकास साधण्यासाठी उपयुक्त माहिती नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी वढोलीत जनजागृती सुरू आहे.
तरंग सुपोषित महाराष्ट्राचा अंतर्गत एका टोल फ्री नंबर वर एसएमएस पाठवून स्वतःची माहिती पाठवून अंगणवाडीतील सेवा,पौष्टिक रेसिपी,गर्भवती आईची काळजी,स्तनदा माता व बाळ यांची काळजी कशी घ्यायची,0 ते 3 वर्ष वयोगटातील बाळाचा सर्वांगिक विकास साधण्याकरिता मार्गदर्शन,स्वछता व अतिसार बद्दल माहिती,किशोरवयीन मुलींना योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी तरंग सुपोषित महाराष्ट्राचा उपक्रमाची वढोलीत तालुका बाल विकास प्रकल्प अधिकारी शरद पारखी,सुपवायजर शंभरकर यांच्या मार्गदर्शनात जनजागृती करण्यात आली .शेकडो नागरिकांनी आपल्या मोबाईल मध्ये उपक्रमात सहभाग घेतला यावेळी अंगणवाडी सेविका अंजना झाडे,मोहिनी कानकाटे, वंदना नामेवार यांनी अथक परिश्रम घेतले.