कोरची
येथील स्थानिक पारबताबाई विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्याना निरोप देण्यात आला असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक एस एस कराडे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे हरिश्चंद्र मडावी , वसंत गुरुनले , जिवन भैसारे , सुरज हेमके, क्रुष्णामाई खुने,निर्मला मडावि , श्यामराव उंदीरवाडे, कैलाश अंबादे ,पराग खरवडे, मुन्शीलाल अंबादे ,आदी उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक एस एस कराडे यांनी विद्यार्थी जीवनाविषयी मार्गदर्शन करून येणाऱ्या परीक्षामध्ये कॉपीमुक्त राहण्याकरिता मार्गदर्शन केले. निरोप समारंभा प्रसंगी वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यानी त्यांना येणारे शाळेतील अनुभव आपल्या मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थीनी स्वतःचा पाया मजबूत करण्यासाठी जिद्द , चिकाटी व मेहनत अभ्यास करून परीक्षेत यश संपादन करून भविष्यात यशस्वी व्हावे , असे आव्हान शालीकराम कराडे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक वर्ग दहावीचे वर्ग शिक्षक वसंत गुरनूले यांनी केले.तर संचालन आरती कलीयरि तर आभार लक्ष्मी घाटघुमर हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वर्ग नववीचे विद्यार्थी लक्ष्मी घाटघुमर, साहिल कोरेटि, परेश मडावी, जगदीश जेँग्थे, तमन्ना पठाण , कशीस पठाण, नेहा मुंडले आदींनी सहकार्य केले.