कोरची
महिला संरक्षणविषयी शासनाने अनेक कडक कायदे व निर्बंध केलेले आहेत मात्र याबाबद अतिदुर्गम भागातील अशिक्षित महिलांना त्याविषयी ज्ञान नाही त्यामुळे काही महिलांवर आजही अत्याचार व त्यांचे शोषण सुरू आहे. तसेच काही सुशिक्षित महिलांवर सुद्धा अत्याचार व शोषण होताना दिसून येतो परंतू अशा अत्याचार विरुद्ध महिलांनी भीती न बाळगता पोलिस ठाण्यात येऊन तक्रार करावी आम्ही नक्कीच त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू असे प्रतिपादन कोरची पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक आसावरी शेडगे यांनी मंगळवारी महिला दिवस मेळाव्यात उपस्थित महिलांना केले.
या मेळाव्याचे अध्यक्ष कोरची तहसीलदार सी आर भंडारी उद्घाटक नवनिर्वाचित नगरपंचायत नगराध्यक्ष हर्षलता भैसारे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ दिक्षा बोदेले, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प बुल्ले,कोरची पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल फडतरे, पोलीस उपनिरीक्षक रवी मनोहर,पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल सूर्यवंशी, धुळे राज्य राखीव पोलीस बल गटाचे पोलिस निरीक्षक ईश्वर सरदार, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमिला काटेंगे, माजी पंचायत समिती सभापती हेमंताशेंडे,नगरपंचायत बांधकाम सभापती तेजस्विनी टेंभुर्णे, महिला बालकल्याण सभापती भगवंती सोनार, नगरसेविका नीरा बघवा, सुनंदा कुमरे, दुर्गाबाई मडावी, प्रतिभा एल मडावी, मालताबाई हिडामी, कौशल्या केवास, बेलगाव घाट येथील उत्कृष्ट शेतकरी पुरस्कारीत रसिका गावतुरे,माजी जिल्हा परिषद सदस्य ज्योतीताई भैसारे,कोटरा पोलीस पाटील लीना तांडेकर,मसेली पोलीस पाटील विद्या बोगारे,साल्हे पोलीस पाटील समशिला कुमरे,गुटेकसा पोलीस पाटील शांती हिडामी, सामाजिक कार्यकर्ते राहुल अंबादे,सियाराम हलामी, भुमेश शेंडे उपस्थित होते.
या मेळाव्यामध्ये महिलांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये प्रथम, द्वितीय,तृतीय आलेल्या स्पर्धकांना योग्य ते पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या मेळाव्यामध्ये तालुक्यातील शालेय व विद्यार्थिनी व शेकडो महिला उपस्थित होत्या. या मेळाव्याचे प्रास्ताविक पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल सुर्यवंशी यांनी केले तर संचालन अशोक ठाकरे व आभार नैताम मेजर यांनी मानले व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.