आजच्या वेगवान जगात प्रत्येक तरुणाच एक स्वप्न असतं. आपल्या हाताला काम मिळावं आपल्या कुटुंबाला आधार द्यावा आणि स्वतःच आयुष्य घडवावं हे स्वप्न डोळ्यात घेऊन महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातून हजारो तरुण तरुणी पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर सारख्या मोठ्या शहरांमध्ये येतात. पण इथे त्यांच्यासमोर येतं एक मोठं संकट. फसव्या प्लेसमेंट कंपन्या आणि या कंपन्या तरुणांना स्किल डेव्हलपमेंट १०० टक्के नोकरीची हमी आणि मोठ्या पगाराची संधी असा अमिष दाखवतात. पण प्रत्यक्षात या कंपन्या गरीब तरुणांकडून लाखो रुपये उकळतात आणि बदल्यात देतात फक्त निराशा. गेल्या काही वर्षात अशा फसव्या प्लेसमेंट कंपन्यांचे प्रमाण महाराष्ट्रात झपाट्याने वाढलं. यामुळे अनेक कुटुंबांच आर्थिक नुकसान झालं तरुणांचा आत्मविश्वास डळमळला आणि त्यांच भविष्य अंधारमय झालं.
मनसेच्या पाठपुराव्याला यश, महाराष्ट्रातही PPA कायदा लागू
जिथे अन्याय होतो तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधीच शांत बसत नाही. या फसवणुकीला आळा घालण्यासाठी आणि गरीब तरुणांची होणारी लूटमार थांबवण्यासाठी मनसेच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाने एक ठोस पाऊल उचललं. महाराष्ट्रात *PPA अर्थात Private Placement Registration Act* लागू करावा अशा आशयाची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण रोजगार आणि स्वयंरोजगार विभागाची होती.
अशावेळी जिथे अन्याय होतो तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधीच शांत बसत नाही. या फसवणुकीला आळा घालण्यासाठी आणि गरीब तरुणांची होणारी लूटमार थांबवण्यासाठी मनसेच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाने एक ठोस पाऊल उचललं. महाराष्ट्रात PPA अर्थात *Private Placement Registration Ac* लागू करावा अशा आशयाची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण रोजगार आणि स्वयंरोजगार विभागाची होती. या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण रोजगार आणि स्वयंरोजगार विभागाने सन्माननीय राजसाहेबांच्या सहीच या मागणीचं पत्र तत्कालीन मुख्यमंत्र्यांना दिलं होतं. आणि पुढे या विषयात सातत्याने पाठपुरावा देखील केला होता. या पाठपुराव्याला यश आलं. हे विधेयक मंजूर झालं.
आसाम, मिझोराम आणि छत्तीसगड या राज्यांनंतर आता महाराष्ट्रातही हा कायदा लागू होत आहे आणि याचं श्रेय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आणि महाराष्ट्र नवनिर्माण रोजगार आणि स्वयंरोजगार विभागाच्या पाठपुराव्यालाच आहे













