गडचिरोली:भामरागड तालुक्यातील कुक्कामेट्टा येथील घटना ताजी असताना येथील समूह निवासी शाळेतील काही मुलींसोबत शाळेचा मुख्याध्यापकच अश्लीश चाळे करीत असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी भामरागड पोलिसांनी मुख्याध्यापक मालू नोगो विडपी (५०) यास अटक केली.
भामरागड तालुका मुख्यालयातील समूह निवासी शाळेत १ ते ७ पर्यंत वर्ग असून येथे निवासी स्वरूपात विद्यार्थिनी शिक्षण घेत असतात. मागील काही दिवसांपासून येथील मुख्याध्यापक मालू नोगो विडपी आपल्याच शाळेतील मुली सोबत अश्लीश चाळे करत होता.परत काल असाच प्रकार शाळेत घडल्यावर मुलींनी एकत्र येत थेट पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली.लगेच भामरागड पोलिसांनी त्या मुख्याध्यापकला अटक केली आहे.
विशेष म्हणजे गडचिरोली जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी नुकतेच या शाळेला भेट देऊन पाहणी केली होती. यावेळी त्यांनी वस्तीगृहातील विद्यार्थिनीशी संवाद देखील साधला होता.त्यांच्या भेटीला दहा दिवस उलटत नाही असा संतापजनक प्रकार उघडकीस आल्याने भामरागड मध्ये एकच खळबळ उडाली आहे.
नुकतेच गडचिरोली तालुक्यांतर्गत येणाऱ्या एका गावातील युवती शौचासाठी गावाबाहेर पडल्यानंतर नराधमाने तिच्यावर अतिप्रसंग केल्याची घटना घडली होती. केल्याचे प्रकरण उघडकीस आले.त्यानंतर भामरागड तालुक्यात चक्क जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापकाने अल्पवयीन शाळकरी मुलींशी अश्लीश चाळे केल्याचे प्रकरण उघडकीस आले.त्यानंतर लाहेरी पोलिसांनी सदर रवींद्र गव्हारे नामक मुख्याध्यापकाला अटक केले.लगेच जिल्हा परिषद प्रशासनाने त्या मुख्याध्यापकाला निलंबित केले.या घटनेची शाई वाळत नाही तोच परत एकदा भामरागड तालुका मुख्यालयातील समूह निवासी शाळेत अल्पवयीन शाळकरी मुलीशी सदर शाळेतील मुख्याध्यापकानेच अश्लील चाळे केल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने सर्व स्तरावरून संताप व्यक्त केला जात आहे.













