भद्रावती : सध्या सर्वत्र धूमधडाक्यात वाढदिवस साजरा करण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांचेच वाढदिवस मोठा खर्च करून साजरे करण्यात येत आहेत. यासाठी मोठा खर्च करण्यात येत आहे. अतिरेकी सजावट, फुगे फोडणे, मेणबत्त्या जाळणे, फटाके वाजवणे असा खर्च सध्या वाढदिवसाला करण्याची चढाओढ निर्माण झाली आहे. त्यामुळे सामाजिक आत्मभान राखून सामाजिक उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे मत जय गुरुदेव स्वच्छ जल संस्थेचे अध्यक्ष रमेश राजूरकर यांनी व्यक्त केले आहे. उपसरपंच मनोज तिखट यांच्या वाढदिवस कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते.
कुचना येथील उपसरपंच मनोज तिखट यांनी वायफळ खर्च न करता वाढदिवसानिमित्त गावातील केंद्रीय विद्यालय,जि.प.शाळा,लहानमुलांचे कॉन्व्हेंट व अंगणवाडी येथील इय्यता ७ वी पर्यंत च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम दि.०७ मार्च रोजी आयोजित केला होता.
या कार्यक्रमाला जय गुरुदेव स्वच्छ जल संस्थेचे अध्यक्ष तथा जेष्ठ नेते रमेश राजूरकर, मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर,जि.प. सदस्य प्रवीण सूर, शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे, माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली,खनिज विकास सदस्य नितीन मत्ते,नंदोरी येथील उपसरपंच मंगेश भोयर, सरपंच सुचिता ताजने, बाजार समिती संचालक बंडू महातळे, तंटामुक्ती अध्यक्ष सुनील साबळे, सरपंच संघटनेचे देवा पाचभाई, कान्होबाजी तिखट,गजू निमकर, दिनेश यादव,वनिता काळे, वर्षा ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.