वरोरा :-
पंचायत समिती वरोरा च्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून घरकुल लाभार्थी मध्ये जाणीव-जागृती प्रचार प्रसिद्धी व्हावे या उद्देशाने ८ मार्च २०२२ रोजी महिला मेळावा घेण्यात आला. यावेळी मंचावरून ग्रामीण भागातून या कार्यक्रमाकरिता उपस्थित महिलांना मार्गदर्शन करतांना पंचायत समिती उपसभापती संजीवनी मिलिंद भोयर आपले मत व्यक्त केले .
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या उपसभापती संजीवनी भोयर , पंचायत समिती सदस्य रोहिणी देवतळे यांचे हस्ते उद्घाटन झाले तर प्रमुख पाहुणे म्हणून सभापती रवींद्र धोपटे, गटविकास अधिकारी राजेश राठोड , सहाय्यक गटविकास अधिकारी संजय वानखेडे, पंचायत समिती सदस्य पार्वता ढोक, डॉ.शालिक झाडे, खुशाल सोमलकर, विजय आत्राम, बँक शाखा व्यवस्थापक श्याम अत्यालगडे , आरोग्य परिचारिका वनिता बरडे उपस्थित होते.
महिला बचत गटांची स्थापना हा महिलांच्या सक्षमीकरणाच्या वाटचालीतील एक महत्वाचा घटक आहे . त्यामुळे केवळ बचत काढणे व कर्ज वाटणे एवढ्यापुरतीच बचत गटांची व्य्प्ती नसून बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे विविध सामाजिक प्रश्न , समस्या या बाबत चर्चा करून त्यासाठी बचत गटामार्फत सामुहिकरित्या सोडविण्याचा विचार केला पाहिजे असे मत भोयार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले .शासनाचे ग्राम विकास विभागामार्फत महा आवास अभियान ग्रामीण अंतर्गत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे बाबत शासनाच्या सूचनान्वये तालुक्यात प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने घरकुल लाभार्थी व बचत गट महिलांचा घेण्यात आला . या मेळाव्यात घरकुल पूर्ण झालेल्या संगीता निखाडे ऐकार्जूना, मालन संतोष नन्नावरे येंसा, अंजना महादेव निमकर ऐकार्जूना या लाभार्थ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. बँक ऑफ इंडिया शाखा वरोराचे शाखा व्यवस्थापक यांनी घरकूल लाभार्थी,महिला बचत गट ,ग्राम संघ, प्रभाग संघ प्रतिनिधी यांना बँकेच्या कर्ज व विमा योजनांची माहिती दिली. याप्रसंगी मंचावर मान्यवरांनी जागतिक महिला दिन, घरकूल आणि इतर योजना बाबत माहिती व मार्गदर्शन केले. घरकूल लाभार्थ्यांची लवकरात लवकर घरे पूर्ण करण्यासाठी सर्वांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले. यादरम्यान उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिला समूहाची तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन सुद्धा लावण्यात आले होते. उपजिल्हा रुग्णालय वरोरा यांचे मार्फत मेळाव्यात सहभागी महिलांची आरोग्य तपासणी व औषध उपचार करण्यात आले. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने उमेद महिलांनी माझा जीवन प्रवास अशा शीर्षकाखाली यशोगाथा सादर केल्या. दरम्यान महिलांनी गीत सादर करून आनंद सोहळा सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाग समन्वयक हर्षा नागपुरे यांनी केले, प्रास्ताविक विस्तार अधिकारी माधुरी येरमे यांनी केले तर आभार सुनीता भोगेकर यांनी मानले . कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी विस्तार अधिकारी निलेश चव्हाण, भावेश भोयर, बादल पाझरे,गौरव सोरते , उमेद तालुका टीम यांनी परिश्रम घेतले.