शिरूर तालुका खरेदी विक्री संघावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार) पक्षाच्या १७ पैकी १० जागा बिनविरोध बाकी ५ जागेसाठी उमेदवार रिंगणात
अल्लाउद्दीन अलवी प्रतिनिधी ता.२७ - शिरूर तालुका खरेदी विक्री संघाच्या अर्ज माघार शेवटच्या दिवशी १७ पैकी १० जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार) पक्ष बिनविरोध करण्यात आले.याकामी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार साहेब मा.सहकार मंत्री आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब व मा.आमदार पोपटराव गावडे साहेब यांच्या आशिर्वादाने व शिरुर हवेलीचे लोकप्रिय आमदार मा. माऊलीआबा कटके यांच्या मार्गदर्शनाने शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष रविबापू काळे,शिरूर आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष मा. मानशिंगभैय्या पाचुंदकर पाटील व शिरुर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती मा.प्रकाशबापू पवार यांच्या विशेष प्रयत्नाने व खरेदी विक्री संघाचे सभापती राजेंद्र नरवडे पाटील यांच्या नियोजनाने आज १७ पैकी १२ जागा बिनविरोध झाल्या .यामध्ये अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी ला १० जागा बिनविरोध मिळाल्या,तर मा.आमदार अशोक पवार यांना अवघी १ जागा बिनविरोध करता आली.तर दुसरी एक जागा बिनविरोध करण्यासाठी रविबापू काळे,मानसिंगभैय्या व राजेंद्र नरवडे यांनी प्रेयत्न केले.तसेच तालुका अध्यक्ष रविबापू काळे यांच्या १० वर्षांच्या अध्यक्ष पदाच्या कालखंडात २०२४ ची लोकसभा निवडणूक सोडली तर प्रत्येक निवडणुक विधानसभा,स्थानिक स्वराज्य संस्था असो किवा अन्य निवडणुका विजय संपादित झालेला आहे.तसेच पुणे जिल्ह्यात बारामती विधानसभा नंतर शिरूर हवेली चा स्टाईकरेट दोन नंबरचा राहिलेला आहे.तसेच अशोक पवारांना विधानसभा नंतर हा मोठा धक्का बसलेला आहे.उर्वरित ५ जागेच्या साठी उमेदवार रिंगणात आहेत.तसेच घोडगंगा कारखान्याचे संचालक दादा पाटील फराटे,पंचायत समिती मा.उपसभापती राजेंद्रजी जासूद,राष्ट्रवादी पुणे जिल्हा महिला अध्यक्षा मोनिकाताई हरगुडे, शिरुर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती मा.सभापती शशिभाऊ दसगुडे,जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे पाटील,पुणे जिल्हा दूध संघाचे चेअरमन स्वप्निल ढमढेरे,मा.सभापती दादासाहेब कोळपे,कारखान्याचे मा.संचालक सुधीर फराटे,प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोरेकर घोडगंगा साखर कारखान्याचे मा. व्हॉ.चेअरमन बाबासाहेब फराटे,युवा राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते व कोंढापुरीचे माजी सरपंच स्वप्नीलभैय्या गायकवाड, घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक सोपानराव गवारे, घोडगंगा साखर कारखाना मा संचालक राजेंद्र गावडे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष श्रीनिवासतात्या घाडगे,शहराध्यक्ष शरदभाऊ कालेवार,परिक्रमा शैक्षणिक संकुल काष्टी चे उपाध्यक्ष हनुमंत पाटोळे, शिरुर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विरेंद्र गद्रे,राष्ट्रवादी तालुका कार्याध्यक्ष कुंडलिकराव शितोळे,मा.सरपंच शिवाजीराव दरेकर,नवनाथ हरगुडे,रंजनभैय्या झांबरे,वीरेंद्र शेलार यांचे निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विशेष सहकार्य लाभले.तसेच बिनविरोध संचालकांचे आमदार माउली आबा कटके यांच्या हस्ते सत्कार करून स्वागत केले. या वेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.