कोरची
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा कोरची येथे दि. ४ मार्च २०२२ रोजी महा आवास अभियान पुरस्कार २०२१-२२ केंद्र शासन व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल महा आवास योजनेंतर्गत “सुंदर माझे घर” या विषयावर चित्रकला आणि निबंध स्पर्धा घेण्यात आली. शासनाकडून मिळालेल्या निधीचा योग्य वापर करून घरकुल योजनेच्या माध्यमातून कमी जागेत व कमी रक्कमेमध्ये घर तयार व्हावे हाच उद्देश.
केंद्र शासनाच्या सर्वासाठी घरे २०२२ या धोरणाची अंमलबजावणी करणे केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजना गतीमान करणे व गुणवत्ता वाढविणे व विद्यार्थ्यांदवारे लोकजागृती करण्याकरिता हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून कोरची येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात येतात. या स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. मु. अ. अरविंद टेंभूरकर, स. अ. कांता साखरे, प्रमोदिनी काटेंगे, मारोती अंबादे, महेश जाळे, विनोद भजने यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. पंचायत समिती कोरची येथील संवर्ग विकास अधिकारी सतीश टिचकुले, गटशिक्षणाधिकारी यशवंत टेंभूर्णे, केंद्र प्रमुख हिराजी रामटेके यांचे मोलाचे सहकार्य लाभले.