.
गोंडपिपरी(सूरज माडुरवार)
गोंडपिपरी-खेडी मार्गाचे काम रखडले होते.मार्गावर अपघातही वाढले.रस्त्यात खड्डे पडल्याने प्रवाश्यांना नाहक त्रास वाढला.नागरिकांनी पत्रव्यवहार केला.याची दखल घेत शनिवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनंतराव भास्करवार यांनी मार्गाच्या कामाची पाहणी करत कंत्राटदाराला काम पूर्ण करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
गोंडपिपरी-खेडी मार्गाचे काम गेल्या तीन वर्षांपासून संतगतीने सुरू आहे.या मार्गाचे काम हेंद्राबादच्या कंपनीकडे होते.आता तेच काम नागपूरच्या कंत्राटदाराकडे आहे.नागरिकांची अडचण लक्षात घेऊन (दि.५) शनिवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनंतराव भास्करवार यांनी गोंडपिपरी खेडी मार्गाच्या कामाची पाहणी केली.यावेळी त्यांनी कंत्राटदाराला लवकर काम पूर्ण करण्याच्या सुचना दिल्या.सदर कामात सातत्य ठेवा.हयगय खपवून घेणार नाही.अशा सूचनाही दिल्या.या सोबतच या मार्गाचे काम येत्या जुलै पर्यंत पूर्णत्वास येईल.अशी माहिती माध्यमांना दिली.यावेळी गोंडपिपरीचे उपअभियंता एन . डी वैद्य यांच्यासह बांधकाम विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.