गडचिरोली:महायुती सरकार स्थापन झाल्यावर राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेन्द्र फडणवीस नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला.या दौऱ्यात त्यांनी थेट राज्याचा शेवटचा टोक आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील गर्देवाडा परिसरातील आदिवासींना मोठं गिफ्ट दिलाय. त्यांनी गट्टा-गर्देवाडा-वांगेतुरी डांबरीकरण रस्ता आणि गट्टा ते गर्देवाडा दरम्यान ताडगुडा येथील नाल्यावरील पुलाचे लोकार्पण करून सदर रस्ता रहदरीसाठी खुलं केला आहे.
एटापल्ली तालुक्यातील जांबिया-गट्टा पलीकडील हा परिसर म्हणजे एकेकाळी नक्षल्यांचा गड म्हणून ओळखला जायचं.स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर देखील याभागात विकासाचा सूर्योदय झाला नव्हता. मात्र वांगेतुरी आणि गर्देवाडा या परिसरात पोलीस मदत केंद्र झाल्यानंतर पहिल्यांदाच प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून गट्टा-गर्देवाडा- वांगेतुरी-मेंढरी ते राज्यसीमा असा ३२.६७ किमीचा रस्त्याचा बांधकाम हाती घेतला.जवळपास दीड वर्षाच्या कालावधीतच सदर रस्त्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले.तर या रस्त्यावर तब्बल ६ छोटे-मोठे पुलाचे बांधकाम केवळ ५ महिन्यांचा कालावधीत पूर्ण करण्यात आलाय.नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते पुलाचे आणि डांबरीकरण रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले.
पुलाच्या लोकार्पण प्रसंगी या परिसरातील उपस्थित आदिवासी बांधवांशी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलखुलासपणे चर्चा करून समस्या जाणून घेतली.यावेळी जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांनी त्यांचे स्वागत करून नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिले.देवेन्द्र फडणवीस यांनी देखील चिमुकल्यांना चॉकलेट देऊन नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.या लोकार्पण कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अविश्यांत पांडा,पोलीस अधीक्षक निलोत्पल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता नीता ठाकरे,राज्य परिवहन महामंडळ विभागाचे अधिकारी तसेच आदी अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते. लोकार्पण सोहळा दरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
४३.०८ कोटींच्या निधीतून रस्त्याचे बांधकाम

गट्टा ते छत्तीसगड राज्यातील कांकेर जिल्ह्याला जोडणारा ३२.६७ किलोमीटर रस्त्याच्या बांधकामासाठी तब्बल ३५ कोटी निधी खर्च करण्यात आला.तर याच रस्त्यावर छोटे-मोठे तब्बल ६ पुलाचे बांधकाम करण्यात आले असून यासाठी ७ कोटी ८० लाख रुपयांची निधी खर्च झाला आहे.एकंदरीत ४३.०८ कोटींच्या निधीतून मुख्य रस्ता आणि पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले.सदर रस्ता आणि नाल्यावरील पुलाच्या बांधकामामुळे या भागातील अनेक गावे मुख्य रस्त्याशी जुळले तर या भागातील नागरिकांना महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन्ही राज्यातील प्रवास सुखकर झालं हे विशेष.
अहेरी ते वांगेतुरी बससेवा सुरू

यापूर्वी एटापल्ली तालुक्यातील जांबिया-गट्टा पर्यंत अहेरी आगारची बससेवा सुरू होती.स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर देखील गट्टा पलीकडील गावातील नागरिकांनी एसटी महामंडळाची बस बघितली नव्हती.मात्र,गर्देवाडा पोलीस मदत केंद्र सुरू झाल्यावर गर्देवाडा ते अहेरी पर्यंत बस सेवा सुरू करण्यात आली होती.आता रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाल्याने अहेरी ते वांगेतुरी पर्यंत बससेवा सुरू करण्यात आली आहे.मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याहस्ते हिरवी झेंडी दाखवून बस सेवा सुरू करण्यात आली. देवेन्द्र फडणवीस यांनी स्वतः प्रवाश्यांसोबत बस मध्ये प्रवास करत हेलिपॅड गाठले.यादरम्यान त्यांनी प्रवाश्यांशी संवाद देखील साधला.












