नागरिकांच्या जीवाशी खेळ : प्रशासनाचे दुर्लक्ष
वरोरा :-शहरालगत दोन वीज निर्मिती प्रकल्प आहेत. वीजनिर्मिती करतांना कोळशाचा वापर केला जातो . कोळश्यापासून तयार होणाऱ्या राखेची वाहतूक करण्याचे कंत्राट सूर्यवंशी ट्रान्सपोर्ट कंपनीला देण्यात आले आहे. मात्र पर्यावरणाचे व वाहतुकीचे नियम धाब्यावर टांगून क्षमतेपेक्षा जास्त राखेची वाहतूक केली जात आहे . त्यामुळे ही राख वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या मागे असणाऱ्या वाहनचालकांच्या डोळ्यात जावून मोठा अपघात होण्याची शक्यता टाळता येत नाही.
शहरालगत असलेल्या साई वर्धा पॉवर प्लांट ची राख वाहतूक करण्याचा परवाना सूर्यवंशी ट्रान्सपोर्ट कंपनीकडे कडे आहे. या कंपनीतून निघणारी राख वरोरा ते नंदोरी तथा पिंपळगाव येथे टाकली जात आहे . जास्त फायद्यासाठी वाहतुकीचे व पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून वाहतूक केली जात आहे. शहरातील आनंदवन चौक , रत्नमाला चौक , बोर्डा चौक वर्दळीचे ठिकाण आहे . या ठिकाणी दिवसभर शेकडो प्रवाशी उभे असतात . राख भरलेली वाहने भरधाव वेगाने व ओवरलोड जात असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही . तर राख भरलेली वाहने ब्रेकर वरून जात असतांना बाहेर राख गाडी बाहेर पडून दुचाकी चालकांच्या व नागरिकांच्या डोळ्यात जात असल्याच्या अनेक तक्रारी नागरिक करतांना दिसतात . मात्र हा सर्व प्रकार येथील स्थानिक वाहतूक कर्मचारी मुंग गिळून बघत असून ट्रान्सपोर्ट कंपनी व वाहतूक पोलीस यांच्या आर्थिक व्यवहार तर झाला नसावा अशी चर्चा ही आता नागरिक करतांना दिसत आहे . त्याच सोबत कमी वेळात ज्यास्त नफा मिळविण्यासाठी बरेचदा रस्त्याच्या बाजूला तर कधी जंगल परिसरात राख खाली करत असल्याचे दृश्य पाहायला मिळते . अगोदरच प्रदुषणामुळे विविध आजार उद्भवत असतांना उडणाऱ्या या राखेमुळे फुफुसांचे आजार उद्भवत आहेत . तरी या प्रकाराला आडा घालावा अशी मागणी . नागरिकांकडून केली जाती आहे .
आर टी ओ कार्यालय कुंभकर्णी झोपेत .
सध्या वरोरा शहरातून कोळसा ,राख यांची ओवरलोड वाहतूक होत आहे . पण कधीही या वाहनांवर कारवाई आर टी ओ विभाग मार्फत केली नसल्याने . आर टी ओ कार्यालय कुंभकर्णी झोपेत तर नाही ना . अशी चर्चा आता शहरात रंगू लागली आहे .