गडचिरोली:महाराष्ट्र शासनाने नागपूरचे वस्त्रोद्योग आयुक्त अविश्यांत पांडा यांची गडचिरोलीचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय दैने यांची शासनाने नागपूर येथे वस्त्रोद्योग आयुक्त या पदावर नियुक्ती केली आहे. संजय दैने यांची लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता काळात निवडणूक आयोगाने गडचिरोली येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली केली होती. अविश्यांत पांडा हे २०१७ च्या आयएएस बॅचचे असून यापूर्वी त्यांनी तळोदा व नंदुरबार येथे प्रकल्प अधिकारी तर अमरावती येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले होते.













