कोरची:- शिक्षकांनी नवनवीन तंत्रज्ञानाच वापर करून आजच्या स्पर्धेच्या युगात अध्यापन केल्यास विद्यार्थी नक्कीच समोर जातील असे प्रतिपादन केंद्र मुख्याध्यापक रामदास कोटगले यांनी मसेलीतील तिसरी शिक्षण परिषदेत अध्यक्ष स्थानावरून शिक्षकांना केले.
कोरची पंचायत समिती अंतर्गत बोटेकसा केंद्राची तिसरी शिक्षण परिषद छत्रपती हायस्कूल मसेली येथे दिनांक 28 फेब्रुवारीला पार पडली. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी बोटेकसा केंद्राचे केंद्र मुख्याध्यापक रामदास कोटगले होते. उदघाटक म्हणून केंद्रप्रमुख राजू परशुरामकर तर प्रमुख अतिथी म्हणून मसेली जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मधुकर मेश्राम कोटरा शाळेचे मुख्याध्यापक शत्रुघन दांडवे बिहिटेकला शाळेचे मुख्याध्यापक ओमराव टेंभुर्ण,सांगोडे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत परशुरामकर यांनी फुलोरा नवीन शालेय अध्यापन पद्धती व इतर विषयावर मार्गदर्शन केले तसेच फुलोरा सुलभक विनोद भजने व योगेश शुक्ला यांनी दीक्षा ॲप व इतर ॲप वर मार्गदर्शन करून सर्व शिक्षकांनी रजिस्टेशन करण्याचे सुद्धा आवाहन यावेळी केले.
सदर कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन फाल्गुन कुळे यांनी केले या परिषदेला बोटेकसा केंद्रातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षक शिक्षिका उपस्थित होते. तर या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.