कुरुल / प्रतिनिधी नानासाहेब ननवरे
‘ब्रह्मदेवाचा बाप आला तरी आम्ही शेतकऱ्यांकडून वीज बिल वसूल करणारच’ उपमुख्यमंत्र्यांचे हे हाय व्होल्टेज स्टेटमेंट शेतकऱ्यांच्या भलतेच जिव्हारी लागलं असून ऐन उन्हाळ्यात बांधावर उभा असणाऱ्या शेतकऱ्यांना घाम फुटला आहे.
कारण मोठ्या कष्टाने घेतलेली पिके आणि हातातोंडाशी आलेल्या फळबागा पाण्याविना खुरपण्या च्या मार्गावर पासून केवळ वसुलीसाठी सुरू असलेल्या हा आडमुठेपणा शेतकऱ्यांना मारक ठरत आहे त्यामुळे महाविकासआघाडी सरकारच्या या वसुलीच्या निर्णयाविरोधात दि. 1 मार्च रोजी टेंभुर्णी करमाळा रोड वर शेलगाव येथे रस्ता रोको करणार असल्याचे जनशक्ती चे प्रमुख अतुल खूपसे पाटील यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, महावितरण कंपनीने शेतकऱ्यांकडून मुंडी वर पाय ठेवत वसुलीच्या प्रोग्राम हाती घेतला आहे. मुळात बिल भरलं पाहिजे हे आम्हाला देखील मान्य आहे. मात्र कोणतीच पूर्वसूचना न देता शेतकऱ्यांच्या शेतातून वीज कट केली जात आहे. अनेक शेतकऱ्यांची पिके हातातोंडाशी आलेली आहेत. त्यामुळे याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. म्हणून शासनाच्या व महावितरण निर्णयाच्या विरोधात उद्या मंगळवार दि. 1 मार्च रोजी जनशक्ती संघटना रस्त्यावर उतरणार असून तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या रास्ता रोको मध्ये सहभागी व्हायचे आहे.
यावेळी राणा वाघमारे, नितीन जगताप, रोहन नाईक नवरे, कल्याण गवळी आदी उपस्थित होते.