गडचिरोली : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर गडचिरोली जिल्ह्यातील 67-आरमोरी (अ.ज.) व 68-गडचिरोली (अ.ज.), व 69-अहेरी(अ.ज.) या विधानसभा मतदार संघाकरिता निवडणुक खर्च निरिक्षक म्हणून भारत निवडणूक आयोगाने भारतीय राजस्व सेवेतील (आय.आर.एस.) श्री राजेश कल्याणम यांची नेमणूक केली असून ते काल गडचिरोली येथे रूजू झाले.
श्री राजेश कल्याणम यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देवून निवडणूक खर्च समितीकडून तयारीचा आढावा घेतला व खर्च नोंदीबाबत निवडणूक खर्च पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
श्री कल्याणम यांनी सायंकाळी आरमोरी विधानसभा मतदार संघात भेट देवून निवडणुक विषयक कार्यालयीन कामकाजाची पाहणी केली व निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती मानसी यांचेकडून निवडणूक यंत्रणेचा आढावा घेतला. यासोबतच खर्च समिती व एसएसटी पथकाला कामाकाजाबाबत मार्गदर्शन केले.
गडचिरोली येथे निवडणूक खर्च समितीचे नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी श्री विलास कावळे, जिल्हा कोषागार अधिकारी लक्ष्मण लिंगालोड, जिल्हाधिकारी कार्यालयाचे लेखाधिकारी रमेश मडावी तसेच खर्च समितीचे सदस्य उपस्थित होते.