पैठण :- दि. २४ सप्टेंबर रोजी पैठण तालुक्यातील बिडकीन येथे मराठा समाजाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. सकल मराठा समाजाच्या वतीने सकाळी १०:०० वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. पंचक्रोशीतील मराठा समाजाच्या बांधवांनी यात मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ बिडकीन शहर बंद ठेवण्यात आले. शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांना पाठिंबा दिला.
सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून शहरातून पायी रॅली काढली. या रॅलीतून त्यांनी व्यापाऱ्यांना शांततेचं आवाहन केलं. त्यानंतर आंदोलकांनी निलजगाव फाट्यावर जाऊन एक तास रास्ता रोको आंदोलन केलं. घोषणाबाजी करत उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यात आला.
बिडकीन पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उपनिरीक्षक गीते, बनगे, बल्लाळ, वाघमुडे, सोकटकर, राठोड, राठोड मॅडम, कानडे यांसह पोलीस कर्मचाऱ्यांनी दक्षता घेतली.
आंदोलनादरम्यान उपस्थित असलेल्या मराठा समाजाच्या नेत्यांमध्ये मनोज पाटील मुरदारे (जिल्हाध्यक्ष), विकास गोरडे, संतोष पाटील कुसेकर, राजू नाना चव्हाण, काकासाहेब टेके, विष्णू मोगल, कृष्णा पाटील उघडे, विजय पाटील शेळके, प्रवीण चव्हाण, किरण गुजर, नितीन वाघ, अशोक टेके, कल्याण शिंदे, मच्छिंद्र हाडे, देविदास चव्हाण, विवेक मोगल, विजय ठोंबरे, प्रभू शिंदे, सचिन हाडे, धनंजय शिंदे, प्रमोद निकम, भगवान शिंदे, धनंजय चिरेकर, विलास आवटी, अशोक हिवाळे, दत्तू अण्णा मोगल, सुरेश मोतींगे, बाला शिंदे, रवी शिंदे, हरिभाऊ कावरे, नारायण मोगल, चंद्रकांत हुड, राहुल पाटील यांचा समावेश होता.