अहेरी: राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार घेऊन एटापल्ली सारख्या आदिवसीबहुल व अतिदुर्गम तालुक्यातील जाजावंडी जिल्हा जिल्हा परिषद शाळेचे नाव संपूर्ण देशात पोहोचविणारे शिक्षक मांतय्या बेडके यांचा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
२० सप्टेंबर रोजी एटापल्ली तालुका मुख्यालयात नारायणा आयएएस अकॅडमी तर्फे करिअर मार्गदर्शन सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मांतय्या बेडके यांचा सत्कार करण्यात आला.नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच आयुष्याचे धडे देऊन शिक्षण क्षेत्रात वेगळं स्थान जपलेल्या मांतय्या बेडके यांना ५ सप्टेंबर रोजी राजधानी दिल्ली येथील विज्ञान भवनात राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता.
विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून कोल्हापूर जिल्ह्यातुन सागर बगाडे आणि गडचिरोलीतुन मांतय्या बेडके या दोघानंच हा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला. केंद्र सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारात आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचा नाव आहे.ही नक्कीच जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे.याचा श्रेय केवळ आणि केवळ शिक्षक मांतय्या बेडके यांनाच जातो असे गौरवोद्गार काढत मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी त्यांची प्रशंसा केली आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिले.
यावेळी तहसीलदार हेमंत गांगुर्डे, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, कार्यकारी अध्यक्ष रियाज शेख आदी मान्यवर उपस्थित होते.