आलापल्ली: कुपोषणमुक्त भारत या संकल्पनेवर आधारित शासनाच्या विविध विभागांमध्ये अभिसरण पद्धतीने पोषण अभियान कार्यक्रम देशपातळीवर राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून 1 ते 30 सप्टेंबर पर्यंत जिल्ह्यात ‘राष्ट्रीय पोषण महिना’ साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने एकात्मिक बाल विकास प्रकल्प अहेरीच्या वतीने आलापल्ली बिटात 14 सप्टेंबर रोजी ‘राष्ट्रीय पोषण महिना’ साजरा करण्यात आला आहे.
अंगणवाडी क्रमांक 9 मध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे उदघाटन छाया कोकुलवार यांच्याहस्ते करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कलावती पसपूनुरवार,प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि प सदस्य अनिता दीपक आत्राम,विस्तार अधिकारी हरिदासी सिखदर,पर्यवेक्षिका बी. डी. नुकलवार आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात अंगणवाडी सेविकांमार्फत परसबागचे महत्व, अंगणवाडी परिसरामध्ये पोषण वाटिकेबाबत जनजागृती,गर्भवती महिलांसाठी पोषक आहाराबाबत मार्गदर्शन,अंगणवाडी पोषण वाटिका स्पर्धा,किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन तसेच सुदृढ बालक स्पर्धा घेण्यात आले.उपस्थित मान्यवरांनी देखील गरोदर माता,किशोरवयीन मुली आणि अंगणवाडी मधील बालक सुदृढ राहण्यासाठी पौष्टिक आहार किती महत्वाचे आहे हे याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आलापल्ली बिटाचे पर्यवेक्षिका बी.डी.नुकलवार, संचालन ज्योती कोमलवार आणि आभार माया नौनूरवार यांनी मानले. राष्ट्रीय पोषण महा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वायलेट सल्लम,पूजा कांबळे,शबाना शेख,वछला मडावी,रजिया शेख,राजूबाई गावडे,छाया मोगरे यांनी सहकार्य केले.