धानोरा :- तालुक्यातील नारी शक्ति व महिलांभगिनीनी एकत्रीत यावे व मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा मोठ्याने प्रसार व प्रचार व्हावा व महिलांना जास्तीत जास्त लाभ मिळावा.याकरिता महिलांचा भव्य महिला मेळाव्याचे नियोजन करण्यासंबंधीत आज दि.०६ सप्टेंबर २०२४ रोज शुक्रवारी बैठकीचे आयोजन मा.खा. अशोकजी नेते यांच्या नेतृत्वात घेण्यात आली.
या प्रसंगी प्रामुख्याने भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम,भाजपा धानोरा तालुकाध्यक्ष सौ.लताताई पुन्घाटे,ता.महामंत्री विजय कुमरे, शहराध्यक्ष सारंग साळवे, संजय कुंडू, साजन गुंडावार, राकेश दास,गजानन साळवे,नरेंद्र भुरसे श्रावण देशपांडे, तसेच मोठ्या संख्येनी ग्रामिण व शहरातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते व नागरिक जनता उपस्थित होते.
यावेळी माजी खासदार अशोक नेते यांनी तालुक्यातील तमाम पदाधिकाऱ्यांना महायुतीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती शेवटच्या घरापर्यंत पोहोचवून त्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले.