अहेरी:कुठलही कार्यक्रम म्हटलं की केवळ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन असे समीकरण रूढ होत असताना केवळ भाषणातूनच कार्यकर्त्यांना संदेश न देता कृतीतून दिलेला संदेश हा कार्यकर्त्यांना कसा भावतो, याचे उदाहरण राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी रविवारी (ता. १ सप्टेंबर) राष्ट्रवादी कार्यकर्ते व नेते यांच्यासमोर ठेवले.गडचिरोली जिल्हा मुख्यालयातील विविध कार्यक्रम आटोपून अहेरी येथील राजवाड्याकडे परत येत असताना आष्टी-आलापल्ली या राष्ट्रीय महामार्गावरील लगाम येथील चौकात गाडी थांबवून टपरीवर चहा घेत चहाचे पैसेही देऊन साधेपणाचा वस्तूपाठच त्यांनी कार्यकर्त्यांसमोर ठेवला. मंत्री डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या या कृतीमुळे कार्यकर्तेही भारावून गेले.
अन्न व औषध प्रशासन मंत्री सध्या गडचिरोली दौऱ्यावर आहेत.त्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील पहिल्या पोषण इनोव्हेशन कौशल्य विकास केंद्राचे उदघाटन आज गडचिरोली जिल्हा मुख्यालयात करण्यात आले होते.गडचिरोली जिल्हा मुख्यालयातून सायंकाळी आपल्या अहेरी मतदार संघाकडे परत येताना मुलचेरा तालुक्यातील लगाम येथील मुख्य चौकात कार्यकर्त्यांना बघून त्यांनी वाहन चालकास गाडी थांबविण्याची सूचना केली. चहाच्या टपरीवर चहा घेत कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
मंत्री डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांनी गाडीतून उतरुन समोर असलेल्या चहाच्या टपरीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह चहाचा आस्वाद घेतला व उपस्थित नागरिक, कार्यकर्ते यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. चहा घेतल्यानंतर त्यांनी स्वतः चहाचे पैसेही दिले.मंत्री डॉ.आत्राम यांनी कृतीतून कार्यकर्त्यांना साधेपणाचा संदेश दिल्याची चर्चा रंगली होती.सायंकाळच्या सुमारास आम्ही नेहमीच चौकातील चहा टपरीवर गप्पा मारत असतो.आम्हाला बघून मंत्री डॉ धर्मराव बाबा आत्राम यांनी स्वतःचा ताफा थांबवत टपरी वर चहाचा आस्वाद घेतला.एक कार्यकर्ता म्हणून आम्हाला अभिमान असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) जेष्ठ कार्यकर्ते अमित मुजुमदार यांनी सांगितले आहे.
यावेळी सिनेट सदस्य तनुश्री ताई आत्राम,लगामचे जेष्ठ कार्यकर्ते अमित मुजुमदार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.