एटापल्ली:महायुतीच्या माध्यमातून विविध लोककल्याणकारी योजना राबविली जात आहेत.महायुती सरकारने केवळ योजनांची घोषणाच केली नाही तर त्या – त्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ देखील लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले आहे.नुकतेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे दोन महिन्याची रक्कम देखील बघिनींच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. मात्र,विरोधकांकडून ही फसवी योजना असल्याचे अपप्रचार सुरू आहे. त्यामुळे विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका असे आवाहन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.
नुकतेच एटापल्ली तालुक्यातील बुर्गी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला.यावेळी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर,तालुका अध्यक्ष श्रीकांत कोक्कूलवार,सरपंच विलास गावडे,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय चरडुके,रामजी कत्तीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुगद उराडे, पंचायत समितीचे माजी सभापती बेबी नरोटे,प.स.चे माजी उप सभापती जनार्धन नल्लावार, जारावंडीचे सरपंच सपना कोडापे,सरपंच ललिता मडावी,मालू पाटील गावडे,गोसू पाटील हिचामी,नगर सेवक रमेश टिकले, लक्ष्मण नरोटे,गेदाचे उपसरपंच दसरू मट्टामी,कैलास कोरेत,सांबय्या करपेत तसेच परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विविध कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना मंत्री आत्राम यांनी विरोधक निवडणूका आले की,येतात आणि भाषण ठोकून जातात.मग पाच वर्ष त्यांचा पत्ताच राहत नाही. सत्ता येते अन जाते.आपल्या लोकांसाठी कोण काम करतो,आपल्यासाठी संकटात कोण धावून येतो याचा आता विचार करणे गरजेचे आहे.देशात मोदी आहेत तर राज्यात परत एकदा महायुती सरकार येणार असून विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ घेऊन स्वतःचा आणि समाजाचा उन्नती करा,असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर सहा अन्य मान्यवरांनी देखील मोलाचे मार्गदर्शन करताना मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या कार्यकाळातील विकास कामांचा पाढाच वाचून दाखविले आणि परत एकदा मोठ्या मताधिक्याने ना.धर्मराव बाबा आत्राम यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आशीर्वाद देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात बुर्गीसह परिसरातील विविध गावांतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.जणूकाही कार्यकर्त्यांचा कुंभमेळाच भरला होता.यावेळी पक्षाकडून कार्यकर्त्यांची गैरसोय होणार नाही याची आयोजकांनी पुरेपूर काळजी घेतली.तर बुर्गी पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी सोमनाथ पुरी आणि त्यांच्या चमूकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.
ना.आत्राम यांचे बुर्गीत अभूतपूर्व स्वागत
नुकतेच एटापल्ली तालुक्यातील बुर्गी या अतिदुर्गम गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला.यावेळी बुर्गी गावात आगमन होताच बुर्गीसह इतर गावातील आदिवासी बांधवांनी ना.धर्मराव बाबा आत्राम यांचे पारंपरिक पद्धतीने ढोल,ताशे आणि आदिवासी नृत्य तसेच रेला नृत्य करून जंगी स्वागत केले.