भद्रावती : माजरी येथील सेवा सहकारी संस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली. निवडणुका या ग्रामीण भागातील सामाजिक स्वास्थ्यावर परीणाम करतात. त्यामुळे सदर निवडणुका बिनविरोध झाल्यास सामाजिक स्वास्थ टिकण्यास मदत होते, अशीच माजरी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष तथा बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व जि. प. सदस्य प्रवीण सूर यांच्या प्रयत्नाने बिनविरोध पार पाडून नविन आदर्श निर्माण करण्याचे कार्य केले आहे तसेच तेथील अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचीसुद्धा बिनविरोध निवड करण्यात आली.
पण सदर सेवा सहकारी संस्थेला कार्यालय नसल्यामुळे कामकाज करणे अत्यंत अवघड व जाचाचे झाले कारण संस्थेची स्वतःच्या मालकीची इमारत नसल्याने कार्यालयाची अडचण निर्माण झाली. त्यामुळे सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप हेकाड व उपाध्यक्ष शंकरराव मांढरे यांनी प्रयत्न करून बँकेचे संचालक तथा माजी अध्यक्ष रवींद्र शिंदे व प्रवीण सूर यांच्याशी संपर्क साधून कार्यालयाबाबत चर्चा केली व माजरी येथील दैवलकर यांच्या घरी कार्यालय करण्याचे निश्चित केले. व सदर सेवा सहकारी संस्थेचे कार्यालयाचे उद्घाटन
चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रवि शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जि. प. सदस्य प्रवीण सूर, पंचायत समिती सदस्य चिंतामण आत्राम, शिवाजीनगर कर्मचारी संस्थेचे अध्यक्ष उत्तमराव झाडे, माजरी सेवा सहकारी संस्था अध्यक्ष प्रदीप हेकड, चालबर्डी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष कालिदास उपरे, कुचना सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष कान्होबा तिखट, मणगाव सेवा सह संस्थेचे अध्यक्ष भारत वाढरे, माजरी सेवा सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष शंकर मांढरे, सचिव गाटकीने साहेब यांची उपस्थिती प्रामुख्याने होती. तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करतांना रवींद्र शिंदे यांनी सहकार क्षेत्रातील विविध उपक्रमाची माहिती दिली तसेच सेवा सहकारी संस्था शेतकरी शेतमजूर यांना कशा प्रकारे मदत करतात व आपण कसे त्यांच्या विविध योजनांचा लाभ घ्यायला पाहिजे याबाबत माहिती दिली. तसेच बँकेतर्फे व ट्रस्ट तर्फ़े सुरू असलेल्या विविध योजनेची माहिती दिली