पुण्याई फाउंडेशन ग्रुप व हरित मित्रपरिवाराचा उपक्रम
वरोरा :- समाजकार्याचा एक भाग म्हणून सातत्याने गरजुंना मदतीचे पुण्याई फाउंडेशन ग्रुप चे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोदगार माजी पाणीपुरवढा सभापती नगरपरिषद वरोरा छोटूभाई शेख यांनी काढले.ज्यांच्याकडे खूप काही आहे त्यांनी त्यातला काही भाग वंचितांसाठी खर्च करावा आणि त्या माध्यमातून शालेय विद्यार्थी , अनाथ , दिव्यांग , निराधार , आर्थिक परिस्थिती मुळे प्रवाहातून बाजूला पडलेली मुलं यांना आधार द्यावा असेही छोटू भाई म्हणाले.
पुण्याई फाउंडेशन ग्रुप वरोरा व हरित मित्र परिवार वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने ०३ ऑगस्ट रोज शनिवारला शहरालगत असणाऱ्या मोहबाळा येथील विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजन व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी पुण्याई फाउंडेशन ग्रुपचे संस्थापक प्रकाश खरवडे , हरित मित्र परिवार वरोरा चे अध्यक्ष किशोर उत्तरवार,मोहबाळा येथील ग्रामपंचायत सरपंच नंदू टेमुर्डे,उपसरपंच शेवंता मोडक,जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता गायकवाड , साईनाथ कॉन्व्हेंट च्या शिक्षिका योगिता सोनकुवर,पल्लवी लोहकरे, प्रेरणा पेटकर , सामाजिक कार्यकर्ते देविदास ताजने,माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दिलीप काळे , इत्यादी मान्यवर उपस्थित होते . या कार्यक्रमाचे संचलन पुण्याई फाउंडेशन चे सदस्य राजेंद्र जुमनाके यांनी केले. पुण्याई फाउंडेशनचे संस्थापक प्रकाश खरवडे यांनी संस्थेच्या उपक्रमांची व संस्थेच्या कार्यप्रणाली ची इतंभूत माहिती उपस्थितांना दिली . सरपंच नंदू टेमुर्डे यांनी संस्थेच्या उपक्रमांची स्तुती केली भावी वाटचाली करीत शुभेच्छा दिल्या.मान्यवरच्या मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांनी मिष्ठान्न भोजनाचा आनंद घेतला. त्यांनतर गावा बाहेरील स्मशानभूमीत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .
या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता पुण्याई फाउंडेशन गृप वरोरा चे पवन वरघने, निलेश आंबुलकर, दीपक मते , सुमित वनकर , सुनील झिलगिलवार , क्रिष्णा शेंडे , रवी खुटाडळकर , आकाश टिपले , रितिक पारखी ,सतीश थेरे, अभय ठेंगणे, करीम लाला ,रवी खुटाळकर व हरित मित्र परिवार वरोराच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले .