गोंडपिपरी :- गोंडपिपरी शहरात मिस्त्री काम करणाऱ्या एका युवकाचा मागील महिन्यात दुर्दैवी मृत्यू झाला.घरचा कमावता पुरुष गमावल्यानंतर कुटुंब एकाकी पडले.दरम्यान दोन चिमुकल्या मुलांचे काय होणार,असा प्रश्न निराधार पत्नीसमोर निर्माण झाला होता.अशावेळी शहरातील प्रतिष्ठित व्यापारी सिमेंटचे विक्रेते संतोष गंधमवार यांनी पुढाकार घेतला.त्यांनी विश्वकर्मा कामगार संघटनेच्या माध्यमातून अंबुजा अभियानातर्गत पिडीत कुटबाला मदतीचा हात दिला.कागद पत्रांची पूर्तता करून नुकतेच अंबुजा कंपनीच्या प्रतिनिधीकडून मृतक अनिल झाडे याच्या परीवाराला दोन लाख रुपयाचा धनादेश प्रदान करण्यात आला.यातून हातावर आणून पानावर खाणाऱ्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला.मृतकाची पत्नी वनिता अनिल झाडे यांना चेक देन्यात आला.यावेळी अंबुजा कंपनीचे प्रतिनिधी शशिकांत रायपूरकर,
शशांत वासेकर, शिवसेना तालुका प्रमुख सुरज माडूरवार,विश्वकर्मा संघटनेचे अध्यक्ष शंकर सोंनटके,सचिव रामदास कोसरे, सुरेश पेदिलवार,घनश्याम ठेकेदार,विश्वनाथ भोयर,शामा चौधरी,संजू निकोडे,राजू निकोडे तामदेव बोरकुटे,भयाजी कोहपरे संदीप शिडाम, बाजार समिती संचालक समीर निमगडे,पत्रकार बाळू निमगडे यांची उपस्थिती होती