सेलू: सततची नापिकी , अतिवृष्टी चा फटका पाहता शेतकऱ्यावर आर्थिक कर्जाचा बोझा वाढत आहे या मुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. त्यातच शेतमालाला सातत्याने कमी मिळत असलेल्या भावामुळे शेती करणे कठीण होत आहे त्यामुळे शेतकऱ्यावर असणारे बँकाचे कर्ज पूर्णपणे माफ करावे अशा मागणीचे निवेदन वर्धा नगर परिषद चे माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन शासनाकडे ही मागणी केली आहे.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सौरभ शेळके, कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक काशिनाथ लोणकर, पंढरी जुगनाके, सलमान पठाण, प्रशांत मुडे आदी सेलू तालुका कोग्रस कमेटीचे पदाधिकारी उपस्थित होते .