सेलू :- सेलू शहरात पावसाळा सुरू होण्या अगोदर पाणी पुरवठा योजनेच्या कामाला सुरूवात झाली हे काम पावसाळ्यातही सुरू असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
सेलू शहरातील प्रभाग ६ मध्ये पाणी पुरवठा योजनेच्या ठेकेदाराने रस्त्याच्या कडेला तर काही ठिकाणी रस्ता फोडून नाली खोदली त्यात पाईप टाकले पण या पाईपावर माती टाकली सततच्या पावसाने सिमेंट रस्ते चिखलाने माखले त्यामुळे दुचाकी वाहन धारकांना वाहन चालवितांना तारेवरची कसरत करावी लागते अनेक वाहन धारकांना घसरून पडण्याची वेळ आली तर काहींना किरकोळ इजा झाली तरी नगर पंचायत मृग गिळून बसल्याचे नागरिक बोलत आहे. या रस्त्याने चार चाकी वाहन खोदलेल्या नालीत फसल्याने जे सी बी चे साहाय्याने काढण्याची वेळ आली आहे त्या मुळे पावसाळ्याच्या दिवसात मातीकाम करणारे पहिले प्रशासन असल्याची चर्चा जोर धरत आहे.
पावसाळ्याच्या दिवसात चांगले रस्ते फोडून पाणी पुरवठा योजनेच्या कामाला जोरात वेग आला आहे या मागचे नेमके कारण काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.पण यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे याला जबाबदार कोण तर नाली भरताना मुरुमाचा वापर करण्यात आला नाही तर मातीचा वापर करण्यात आल्याने चिखलमय परिस्थिती निर्माण झाली आहे.
जे काम हिवाळा व उन्हाळ्यात करायला पाहिजे ते काम पावसाळ्यात होत असून नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे या बाबत नगर पंचायत पदाधिकाऱ्यांना याचीमहिती दिली पण या कडे लक्ष देण्यास कोणीही तयार नाही त्यामुळे रस्त्याने जावे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे
हिम्मत अली शहा, माजी नगरसेवक नगर पंचायत सेलू