गोंडपिपरी (सुरज माडूरवार)
तालुक्यातील ग्रा. पं.कूडेसावली गावातील पाणी पुरवठा करणारी टाकी हि कित्येक दिवसांपासून जिर्णावस्थेत होती.त्यापासून गावात अनुचित घटना घडण्याचा प्रसंग उद्भवणार होता यासाठी येथील ग्रामस्थांनी क्षेत्राच्या पूर्व जिल्हा परिषद सदस्या वैष्णवी अमर बोडलावार यांचे कडे नवीन टाकीची मागणी केली.नागरिकांची मागणी महत्वपूर्ण असल्याने त्याचे गांभीर्य ओळखून वैष्णवी बोडलावार यांनी गावातील जुन्या पाण्याच्या टाकीचे निरीक्षण केले, असता ती टाकी जिर्ण झाल्याचे निदर्शनास आले.दरम्यान ग्रामस्थांची मागणी रास्त आहे.आणि भविष्यात यामुळे ग्रामस्थांना नुकसानीचा सामना करावा लागेल हा अंदाज वर्तवत माजी जि.प.सदस्या वैष्णवी अमर बोडलावार यांनी कुडेसावली गावात नवीन जलकुंभ निर्मितीसाठीचा वरिष्ठांना पाठपुरावा केला.अल्पावधीतच त्यांच्या पाठपूराव्याला यश आले.आणि त्यांच्या या लोकहिताच्या मागणी मान्य करून जल जीवन मिशन योजनेंतर्गत, जि.प. पाणी पुरवठ्याच्या माध्यमातून ९६ लक्ष रू. चे नवीन पाण्याची टाकी मंजुर करण्यात आली होती.आज ती पूर्णत्वास आली असून त्याचे लोकार्पण वैष्णवी बोडलावार यांचे हस्ते करण्यात आले.
याचबरोबर ग्रा. पं.च्या पंधरा वित्त निधी अंतर्गत स्थानिक जि. प.शाळेतील विद्यार्थ्यांना व अंगणवाडीतील बालकांना शुद्ध पाणी मिळावं यासाठी १,७५००० रू. चे RO उपलब्ध करून देण्यात आले.याखेरीज पंधरा वित्त अनू.जाती व नवबौद्ध घटक वस्ती योजनेंतर्गत १०,२०,००० रू. चे नाली बांधकाम मंजुर करण्यात आले.या समस्त योजनेच्या माध्यमातून मंजुर करण्यात आलेल्या विकास कामांचे भूमिपूजन या क्षेत्राच्या कर्तव्य दक्ष जिल्हा परिषद सदस्या वैष्णवी अमर बोडलावार यांच्या हस्ते करण्यात आले.समारंभा प्रसंगी आपण इतक्यातच थांबले नाही,यानंतरही या गावासाठी विकासकामांचा धडाका असाच अविरत सुरू राहील यासाठी मी सदैव कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.पाण्याचा प्रश्न सूटल्याने गावकऱ्यांनी विश्वासाचा श्वास घेत वैष्णवी बोडलावारांचे मनोमन आभार मानले.या शुभ कार्य प्रसंगी ग्रा.पं.कडून समस्त गावकऱ्यांना डस्टबिन व अंगणवाडीतील मूलांना पाण्याचे बाटल आणि शाळेतील विद्यार्थांना नोटबूकचे वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रमास माजी जि.प.सदस्य अमर बोडलावार, सरपंच मारोती मडावी,उपसरपंच राजेश डोडीवार, ग्रा.पं.सदस्य विलास सूर,विलास पिपरे ,दिपा ऊपरे,नंदा सूर,सूनंदा टेकाम, सूजाता गेडाम, पोलीस पाटील अंगूलीमाला चांदेकर, ग्रा. पं. सचिव जितेंद्र खोब्रागडेसह सर्व शिक्षकवृंद आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.