गिऱ्हेंना मैदानात उतरवून ठाकरे गट महाविकास आघाडीचे बुरुज राखणार !
सुरज माडूरवार ( जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर)
राज्यात विधानसभा निवडणुकीची चाहूल लागली.चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्येक पक्षाकडून तयारी सुरू झाली.मात्र यात ‘उबाठा’च्या संदीप गि-हेनी घेतलेली भरारी उल्लेखनीय आहे.पायात भिंगरी घालून अल्पावधीतच त्यांनी संपूर्ण बल्लारपूर विधानसभा क्षेत्र पिंजून काढला.यादरम्यान प्रत्येक क्षेत्राला न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला.साहेबांचा आदेश म्हटले की ‘रिझल्ट’ देणारच,या महत्वाकांक्षेपोटी क्षेत्रातील अगदी शेवटच्या माणसाला भावणार अशा जनहिताच्या कार्यक्रमाची आखणी आणि प्रस्थापितांना हादरवून सोडणारा भला मोठा महीला व तरुणाईच्या समूहाची मूठ बांधून बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात शिवसेनेच्या उबाठा गटाची मशाल पेटविली.सुधीर मुनगंटीवार सारख्या बलाढ्य उमेदवाराच्या क्षेत्रात पहिल्यांदाच गिऱ्हे यांनी रोजगाराची क्रांती घडवून आणली.
.
सत्ताधाऱ्यांच्या फसव्या रोजगार नीतीला कंटाळलेल्या असंख्य महिलांनी व युवकांनी ‘उबाठा’ची वाट पकडली.या क्षेत्रात विधानसभा निवडणुकीत सातत्याने काँग्रेसचा पराभवच होत आला.तिथे आता संदीप
गिऱ्हे यांची जोरदार हवा सुरू आहे.येथील युवकांनी त्यांना स्वीकारल्याचे दिसत आहे.तरुणाईमध्ये सहज मिसळून सोबत दिवस घालविणारा नेता या क्षेत्रातील लोकांना आपल्या हक्काचा वाटू लागला आहे.मागणी मांडून समस्या सोडविण्याची धमक गिऱ्हे यांच्यात होती,आताही दिसते.विषय हाती घेतला की ‘रिझल्ट’ येईपर्यंत पिछा पुरविणारा म्हणून त्यांची जिल्ह्यात ख्याती आहे.अशा नेतृत्वाची घडकेबाज तोफ बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात धडाडल्याने अनेक राजकारण्यांच्या विचाराची दिशा बदललेली तर जनतेत मोठ्या प्रमाणात परिवर्तनाचा ध्यास दिसून येत आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी बल्लारपुर विधानसभा क्षेत्र पिंजून काढत कार्यक्रमाचा सपाटा लावला आहे.क्षेत्रातील गावा-गावात गाठीभेटी बुथ,बिएलओची बैठका, सामाजिक कार्यक्रमात हजेरी लावताना दिसत आहे.युवा असल्याने युवा वर्गांची गिऱ्हे यांना पसंती मिळत आहे.बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील दुर्गापुर, ऊर्जानगर मधे मोठ्या प्रमाणात संदीप गिऱ्हे यांचा चाहता वर्ग असल्याने त्यांची बाजू भक्कम मानल्या जात आहे.जिल्ह्यात ज्या ज्या निवडणुका गिऱ्हे यांच्या नेतृत्वात लढवल्या त्यात त्यांना यश मिळाले.बल्लारपूर विधानसभेतील पोंभूर्णा नगरपंचायतीत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे ५ नगरसेवक आहे.बाजारसमितीतही गिऱ्हे यांच्या चाणक्य नीतीने शिवसेनेची मशाल पेटली उपसभापती पद शिवसेनेला मिळाले. भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत थेरगाव,आष्टा,घनोटी, वेळवा,सुशी,भवराडा,दहेली,जुनी दहेली,चोरगाव मामला,निंबाळा, शिनाडा अशा अनेक ग्रामपंचायतीत सरपंच निवडून आणले. नुकतच नागपूर येथे रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रमात बल्लारपूर येथील तीन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.सोबतच मागील वर्षी जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीन पिकावर कीड व रोगाचा व्यापक प्रमाणात प्रादुर्भाव होऊन पिकांचे नुकसान झाले होते .प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या तरतूदीतील हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या जोखमीच्या बाबी अंतर्गत अधिसूचना लागू झाली होती त्यात 46 हजार 992 शेतकऱ्यांचा समावेश होता. पिक विमा कंपनीने 23 कोटी रुपये मंजूर केले होते परंतु रब्बी हंगाम सुरू होऊन देखील मागील वर्षी शेतकऱ्यांना खरीप हंगामातील नुकसान भरपाई मिळाली नव्हती. त्यातच अवकाळी पावसाचा जोरदार तडाका सुरू होता मात्र पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत कार्यवाही न केल्याने ओरिएंटल पिक विमा कंपनीचे कार्यालय
गिऱ्हे यांनी आक्रमक भूमिका घेत कार्यालयाची तोडफोड केली व हजारो शेतकऱ्यांना पिक विमा मिळवून दिला शेतकऱ्यांना न्याय मिळाला.नुकतच मूल तालुक्यातील फीस्कुटी वीरई, चिचाळा,हळदी,ताडाळा,दहेगाव, भेजगाव या गावात पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत नाही त्यामुळे शेती ही सिंचनाच्या भरोशावर अवलंबून असते अशावेळी पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू होता त्यात गोसीखुर्द प्रकल्पाचा पाणी पुरवठा बंद होता
संदीप गिऱ्हे यांनी आंदोलनाचा अलटीमेटम दिला तात्काळ सिंचाई विभागाने मागणीची दखल घेत गिऱ्हे यांना फोन वरून संपर्क साधत आंदोलन न करण्याची विनंती केली १८ ते २५ जुलै पर्यंत पाणी प्रश्न मिटेल असे आश्वस्थ केले व शेतकऱ्यांनी गिऱ्हे यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील युवाशक्तीला सक्षम करण्यासाठी 28 जुलै 2024 ला मुल येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्यात देशातील नामांकित पन्नास कंपन्या सहभागी होणार असून थेट मुलाखती घेऊन पात्र उमेदवारांना नोकरीचे नियुक्त पत्र देण्यात येणार आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात पहिल्यांदाच गिऱ्हे यांनी रोजगाराची क्रांती घडवून आणल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
एकंदरीत बल्लारपूर विधानसभा क्षेत्रासह जिल्ह्यातील गरीब,कष्टकरी,मागासवर्गीय जनतेच्या हितासाठी वेळोवेळी आंदोलने केल्याने मोठ्या प्रमाणात गिऱ्हे यांच्या पाठीशी शेतकरी वर्ग उभा असल्याचे दिसत आहे.मंत्री सुधीर मुनगंटीवार सारख्या दिग्गज नेत्याला टक्कर देण्यास सक्षम असलेला उमेदवार म्हणूनही संदिप गिऱ्हे यांचेकडे पाहिले जात आहे.