१८ जनावरांची सुटका
गोंडपिपरी -(सुरज माडुरवार)
गोंडपिपरी पोलिसांनी गुरुवारी दुपारी तीन वाजता दरम्यान आष्टी – गोंडपीपरी मार्गावर तारसा येथे कारवाई करत महाराष्ट्रातून तेलंगणा राज्यात अवैधरीत्या जनावरांची तस्करी करणाऱ्या दोन पीकअप वाहने जप्त करून एकूण १८ जनावरांची सुटका केली.याप्रकरणी ४ आरोपिना अटक करण्यात आली असून १३ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
राहुल दिलीप रॉय वय (१९) रा.पक्खानुर (छत्तीसगड),प्रवीण अधिकारी वय (१९) रा.पक्खानुर (छत्तीसगड),वैभव चौधरी वय (२४) रा.शिवणी तालुका (गोंडपिंपरी),शामसुंदर बाला वय (३९) रा.मुलचेरा जिल्हा (गडचिरोली) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.गोंडपिपरी पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर तारसा फाट्यावर ठाणेदार रमेश हत्तिगोटे यांनी पोलीस सहकारी मनोहर मत्ते, तिरुपती गोडसेलवार, कुळमेथे,प्रशांत नैताम सहकाऱ्यांसह सापळा रचत पीकप सी जी 19 बी क्यू 4717, टी एस 16 यू सी 7530 वाहनांना थांबवून तपासणी केली असता १८ जनावरे आढळून आले.जनावरे दाटीवाटीने वाहनात कोंबून निर्दयीपणे वाहतूक केली जात होती. याप्रकरणी आरोपी विरोधात पोलिसांनी महाराष्ट्र पशु संरक्षण, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमानुसार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार हत्तीगोटे यांनी गोंडपिपरी पोलीस स्टेशनचे सूत्रे हाती घेतल्यापासून गेल्या सहा महिन्यात चार मोठ्या कारवाया करत यापूर्वी २५० जनावरांची सुटका केली हे विशेष