सोलापूर प्रतिनिधी :- आर बी दयावान संस्थेचे मार्गदर्शक रजनीकांत बाळशंकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नुकतीच चालू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मोफत शिबिर भवानी पेठ परिसरामध्ये घेण्यात आले.
भवानी पेठ परिसरात मोलमजुरी करून आपली उपजीविका भागवणारे हजारोच्या संख्येने लोक वास्तव्यास आहेत व या सर्व लोकांना योजनेचा लाभ मिळावा याकरिता शिबिराचे आयोजन संस्थेच्या वतीने करण्यात आले.
या शिबिरामध्ये 898 नागरिकांचे फॉर्म भरण्यात आले आहे. यावेळी सर्व महिलांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून सामूहिक वंदना घेण्यात आली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष रमाकांत बाळशंकर, आयोजक विश्वभूषण कांबळे, ऑपरेटर रोहित उबाळे, रोहित शिंदे, सम्यक मस्के, बुद्धभूषण कांबळे, विश्वरत्न कांबळे, दीपक भालेराव आदी मान्यवर व परिसरातील महिला उपस्थित होत्या.