गोंडपिपरी – (सुरज माडूरवार)
आधीच कर्जबाजारी त्यात बियाणे टाकल्यानंतर पावसाने मारलेली दडी बियाण्यांचे झालेले नुकसान,यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी घडली.
गोंडपिपरी तालुक्यातील घडोली येथील अल्पभूधारक शेतकरी विठ्ठल भाऊजी चौधरी वय (४२) हा शेतीचा हिस्सेदार असून वडिलांनी याच्या वाटणीची शेती याला कसण्यासाठी दिली .त्या शेतात तो पिके घेत असताना कधी अतिवृष्टीमुळे तर कधी दुष्काळामुळे सततच्या नापिकीमुळे आर्थिक संकटात सापडला होता.वडिलांच्या नावाने सातबारा असल्याने कुठलेही पीक कर्ज विठलला मिळत नसल्याने खाजगी कर्ज घेऊन शेती हंगाम करत होता. यावर्षी देखील बियाणे पेरले पाऊस योग्य वेळी न आल्याने मोठा फटका बसला. आर्थिक विवंचनेतून अखेर विठ्ठल हताश होत घरी कुणी नसलेली संधी साधत दि.(२४) सोमवारी सायंकाळी चार वाजता दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली. विठ्ठल चौधरी यांच्या पश्चात दोन मुली, पत्नी ,आई-वडील दोन भाऊ असा आप्तपरिवार असून हळहळ व्यक्त केल्या जात आहे.