पुलगाव :- येथील बस स्थानकावर रोज कोणती ना कोणती गुन्हेगारी घटना घडतात.समोर पोलीस स्टेशन आहे,तरी खिसेकापू येथे सक्रिय आहेत.
पुलगावचे व्यापारी हकीमी हार्डवेअरचे मालक फकरुद्दीन ताहेर अली बोहरा 9.06.24 रोजी लग्नासाठी सकाळी 10.30 वाजता पुलगाव ते आर्वी जात होते. बसस्थानक वर पाकीट मारले. त्या पाकेटमधे 3 हजार 500 रुपये ते 4 हजार रुपये व आधार कार्ड, एसटीचे कार्ड , देवाचे फोटो होते. त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली नाही.कारण लग्नाला जायला उशीर होत होता. रोज अशा प्रकारे कितीतरी घटना घडतात.लोक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी जात नाही कारण तिथे त्यांना दोन ते तीन तास तक्रार देण्यासाठी बसावे लागते. या कारणाने कोणी पोलीस स्टेशनच्या भानगडीत पडत नाही.
मागील काही दिवसापूर्वी महिलांचे मंगळसूत्र ओढून नेणारी टोळी सक्रिय होती.महिलांचे दागिने मोठ्या प्रमाणावर बस स्थानक परिसरातून या टोळीने पळवुन नेले.
बस स्थानकावर शाळेच्या मुली आपल्या बसच्या प्रतिक्षेत बसल्या असतात. टवाळखोर मजनू हे दिवसभर आपल्या लैलाची वाट पाहत दिवसभर बस स्थानकावर येऊन चक्कर मारतात व दररोज वाद करतात. हे प्रकार दररोज बस स्थानकावर सुरु असतात.या वादातून हाणमारी होते. पोलिसांनी अंकुश लावण्याची गरज आहे. पोलिसांना माहीत असून पोलीस खिसे कापू टोळी सोडून देते,अशी काही लोक चर्चा करत होते.पूर्वीचे ठाणेदार स्वतः विनाकारण कोणी आढळल्यास फटके देत होते. त्यावेळेस पाकीट मारायची घटना कमी झाली होती. आता दिवसें दिवस पुलगाव बस स्थानकावर खिसे कापणे, पाकीट चोरणे या घटना मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने पोलिसांनी बस स्थानकावर लक्ष केंद्रित करणे, गरजेचे आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी बस स्थानकावर रोज तीन ते चार राऊंड मारून तिथे टवाळखोर टोळी व पाकिटमार यावर लक्ष देऊन लोकांना सुरक्षा प्रधान करणे, गरजेचे आहे.