पुलगाव – येथील गुलजारी प्लॉट भागामध्ये खुलेआम सुरू असलेली दारू विक्री यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्यामुळे ही दारूविक्री त्वरित बंद करावी व दारू विक्री करणाऱ्या महिलेवर कारवाई करावी,अशी मागणी परिसरातील नागरिकांनी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करून केली आहे.
वर्धा जिल्ह्यामध्ये दारूबंदी असताना सुद्धा पुलगावातील महावितरणच्या पावर हाऊस समोरील गुलजारी प्लॉट व पंचशील नगर (कुर्ला ) परिसरामध्ये श्रीमती मालाबाई चिरडे यांचा अवैध दारूविक्रीचा व्यवसाय आहे. पहाटे तीन वाजता पासून तर रात्री बारापर्यंत दारू पिणारे व्यक्ती येथे ये जा करत असतात. दारू प्राशन केल्यानंतर हे मद्यपी शिवीगाळ करत असतात, उलट्या करत असतात, ठोकल्यानंतर मारहाणीची धमकी पण देतात. या परिसरामध्ये कुटुंबासहित सर्व राहत असल्यामुळे कुटुंबातील महिला, सुना,मुली, लहान मुले यांना घाणेरड्या शिव्या ऐकाव्या लागतात. दारुविक्री करणारी महिला शिव्या व धमक्या देत असल्यामुळे या परिसरातील जनता त्रस्त झाली आहे. पोलिसांनी त्वरित कारवाई करून दारुविक्री करणाऱ्या महिलेचा बंदोबस्त करावा, अन्यथा पोलिस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.निवेदन सुमे उसके, तृप्ती भरणे, रजनी धनविज,मंदा फुसाटे, अनिता पाटील, कल्पना कळविले,शशी सांगोले,सुरेखा घरडे, मंदा कोल्हे,शिल्पा उके,रिता धांदे,निता डिवरे, प्रियंका डिवरे,नाजयाज खान, वैशाली खोब्रागडे,लिला चेडे, मोहिनी बोबडे,माया चेडे,प्रिती बोदिले, अनेक महिला नी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.