मूल प्रतिनिधी :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका मूलच्या वतीने वर्धापन दिनाचे औचित्य साधत गडचिरोली लोकसभेच्या मतदानाच्या दिवशी मूळचे मूल तालुक्यातील टेकाडी या गावातील असलेले जराते कुटुंब पण सध्या गडचिरोली जिल्ह्यातील एकोडी या गावी वास्तव्यास असलेले जराते कुटुंबातील संजय बालाजी जराते आणी त्यांच्या पत्नी शुभांगी संजय जराते या कामासाठी लोकसभेच्या निवडणूकीतील मतदान करून आंध्रप्रदेश येथे काम करण्याकरिता जाण्यासाठी निघाले असताना गावाजवळच त्यांचा अपघात झाला या अपघातात त्या दोघांनाही मृत्यूला सामोरे जावे लागले.
अचानक त्यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या पश्चात त्यांचे दोन लहान मुले चेतन आणि यश आठ आणि दहा वर्षाच्या दोन मुलांची जबाबदारी या म्हाताऱ्या आजी आजोबा वर येऊन पडली. या घटनेची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष मंगेश पोटवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत तीन वर्षाकरिता त्यांना शैक्षणिक मदतीकरिता दत्तक घेत अल्पसा का होईना आधार मिळावा या हेतूने रोख रक्कम आणि शैक्षणिक साहित्य बालकाच्या उपस्थितीत आजोबा बालाजी जराते यांचेकडे सुपूर्द केले.
दरवर्षी वर्धापन दिनाच्या दिवशी त्यांना रोख रक्कम आणि शैक्षणिक साहित्य दिल्या जाईल. असे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निश्चय करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस मुल शहर अध्यक्ष आकाश येसनकर, महिला शहर अध्यक्ष धाराताई मेश्राम, महिला तालुका अध्यक्ष संगीताताई गेडाम,रोजगार आघाडी अध्यक्ष रजत कुकुडे,वैद्यकीय मदत कक्षाचे तालुका अध्यक्ष आनंदराव गोहणे, युवक तालुका अध्यक्ष रोहित कामडे,अर्चनाताई सुखदेवे,सुनील कामडी, भोई समाजाचे अध्यक्ष तुकाराम गोहणे, ईश्वर जराते उपस्थित होते.