गोंडपिपरी-सुरजागड लोहखनिज प्रकल्पाचा सामाजिक चेहरा अनेक माध्यमातून समोर आला. अलीकडे अहेरी – गोंडपिपरी मार्गाची दुरवस्था झाली.त्यामुळे नागरिकांत असंतोष वाढला.याही परस्थितीत सुरजागड लोह प्रकल्पाने सामाजिक बांधिलकी जोपासत परिसरातील घडलेल्या अनेक घटनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला.काल दि (७)शुक्रवारी अहेरी आष्टी मार्गावर लग्नाच्या वरहाड्यांचा ट्रक अनियंत्रित झाल्याने उलटला.त्यामधे १५ ते २० लहान मोठ्या नागरिकांचा समावेश होता.त्या दरम्यान सुरजागडच्या सुरक्षा पथकाला घटनेची माहिती मिळाली.तात्काळ घटना स्थळ गाठून त्यांनी तेथील परस्थिती नियंत्रणात आणली.यावेळी त्यांनी सुमारे दीड ते दोन तास मदतीसाठी रेस्क्यू ऑपरेशन राबवून माणुसकीचा परिचय दिला.
गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड लोहखनिज प्रकल्पामुळे आदिवासी बहुल जिल्ह्याच्या विकासाची दारे खुलली.मात्र लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्याला या प्रकल्पाचा फटका बसताना दिसत आहे .अशावेळी अहेरी गोंडपिपरी मार्गावर वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला. त्यामूळे अधून मधून अपघात सुधा घडताना दिसून येत आहे .अशावेळी सुरजागड प्रकल्पाचे मदत पथक ॲक्टिव होऊन काम करीत आहे.दिवसरात्र डोळ्यात अंजन घालून त्यांचे पथक मानवीय दृष्टिकोनातून जबाबदारी पार पाडताना दिसत आहे.अशाचतच काल घडलेल्या एका भीषण अपघातातून सुरजागडच्या गस्ती पथकाने दहा ते बारा लोकांचा जीव वाचिवला.झाले असे अहेरिकडून आष्टी च्या दिशेने वऱ्हाडी घेऊन येत असलेला ट्रक बोरी गावा जवळ उलटला.चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मद्यरात्री हा प्रकार घडला.दरम्यान प्रकल्पाचे सुरक्षा पथकाचे प्रमुख विनोद कुमार यांच्या नेतृत्वातील टीम नेहमी प्रमाणे काल देखील कर्तव्यावर हजर होती.त्यांना या घटनेची कल्पना मिळताच तात्काळ ही टीम मोक्यावर हजर झाली.दरम्यान रात्री एक वाजतापासून घटनास्थळावर त्यांच्या रेस्क्यु ऑपरेशनला सूरवात झाली.विनोद कुमार यांच्या मार्गदर्शन व नियंत्रणात तब्बल दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर ट्रक खाली दबलेल्या जखमी लोकांना बाहेर काढण्यात पथकाला यश आले.यानंतर कंपनीच्या रुग्णवाहिकेतून गंभीर जखमी राहिलेल्या चार रुग्णांना चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठिवण्यात आले.तर उर्वरित किरकोळ जखमींना आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.या रूग्नांसोबत स्वतः सुरजागड प्रकल्पाची टीम दवाखान्यापर्यंत हजर होती.यावेळी तातडीची मदत म्हणून कंपनीने जखमींना आर्थिक सहकार्य केले.दरम्यान परिसरातील सरपंच दिपक मडावी हा स्वतः या अपघातात जखमी झाले.त्यांनादेखील सूरजागड कंपनी व्यवस्थापनाने मदतीचा हात दिला.यातून एका मोठ्या अपघाताला सावरण्याचे कार्य घडले असून जीवितहानी देखील टळली.त्यामुळे कंपनी व्यवस्थापक व मदत पथकाचे नागरिकांनी आभार मानले.