घुग्घुस :- रुवार 17 फेब्रुवारीला घुग्घुस नगर परिषदेच्या मुख्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती अश्वारूढ पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी घुग्घुस नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अर्शिया जुही यांची कार्यालयात भेट घेतली व या विषयावर चर्चा केली तसेच निवेदन देऊन मागणी केली आहे.
घुग्घुस नगर परिषदेचे निर्मिती झाली असून लवकरच नगर परिषदेच्या नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे नवनिर्मित घुग्घुस नगर परिषदेच्या मुख्यालयासमोर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा. घुग्घुस हे औद्योगिक शहर असल्याने घुग्घुस शहराची लोकसंख्या मोठी आहे. घुग्घुस शहर वासियांच्या मनात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आदराचे स्थान आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा हा नगर परिषदेमध्ये भेद देणाऱ्या सर्वांना नवीन ऊर्जा प्रदान करेल तसेच शासन कर्त्यांना सुद्धा आपले कर्तव्य बजावतांना व निर्णय घेतांना प्रेरणा मिळेल. त्यामुळे घुग्घुस नगर परिषदेच्या मुख्यालया समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन देतांना भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपाचे विनोद चौधरी, सिनू इसारप, शरद गेडाम, सतीश कामतवार, पियुष भोंगळे उपस्थित होते.