आनंदवन :- महारोगी सेवा समिती वरोरा संचालित निजबल अंतर्गत संधिनिकेतन अपंगांची कर्मशाला, आनंदवन येथे दिव्यांग व्यक्तिना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून बोर्डाच्या खाजगी विद्यार्थी परीक्षा योजने अंतर्गत (17 नंबर फॉर्म) दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसविले जाते. सदर विद्यार्थ्यांना विनामूल्य निवासी सुविधे सह नियमित शिकवणी वर्ग ही घेतले जाते. यावर्षी 18 कर्णबधिर ,11अंध व 1 अस्थिव्यंग असे एकूण 30 दिव्यांग विद्यार्थी परीक्षेला बसले. सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करीत 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली .यात श्रेया वामन पावडे या अंध विद्यार्थ्याने 76.33 टक्के गुण मिळवित प्रथम स्थान पटकावले तर दीपक चौधरी या मूकबधिर विद्यार्थ्याने 67.33 टक्के गुण मिळवित सदर प्रवर्गात प्रथम क्रमांक घेतला.
व्यवस्थापकीय अधीक्षक रवींद्र नलगिंटवार यांचे नेतृत्वात राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात बारावी परीक्षा समन्वयक प्रवीण ताठे, आशीष येटे, नितीन आवरी, रमेश पवार या शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली. परीक्षा व पूर्व तयारी करीता राधा सवाने,उप प्राचार्य ,आनंद निकेतन महाविद्यालय , राखे , लोकमान्य विद्यालय यांचे बहुमोल योगदान व मार्गदर्शन प्राप्त झाले. सदर यशा करीता संस्थेचे सचिव डॉ. विकास आमटे, डॉ. भारती आमटे, कार्यकारी विश्वस्त कौस्तुभ आमटे,पल्लवी आमटे, डॉ. विजय पोळ,विश्वस्त, सुधाकर कडू , सदाशिव ताजने, माधव कवीश्वर यादी मान्यवरांसह आनंदवन वासियानी यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकाचे अभिनंदन केले.. पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या.