कोरची : आजच्या तरुण पिढीला क्रिकेट हा खेळ खूप आवळतो या खेळामुळे तरुणांना शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी मदत होतो. त्यामुळे अशा प्रकारच्या स्पर्धा तालुक्यात नेहमी ठेवण्याची गरज आहे असे प्रतिपादन पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल सुर्यवंशी यांनी केले. कोरोना काळात तरुणांना क्रिकेट स्पर्धा भरविण्यासाठी निर्बंध होते मात्र काही प्रमाणात शिथिलता मिळाल्याने तरुणांमध्ये आनंद बघायला मिळत आहे त्यामुळे खेळतांना स्पर्धकांशी कुठलाही प्रकारचे नियमाबाहेरील वादविवाद भांडण न करता विजय मिळवावे असे या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून डॉ स्वप्नील राऊत खेळाळूंना मारदर्शनात बोलत होते व प्राचार्य यु यु ढोक यांनी सर्व खेळाडू व क्रिकेट प्रेमींना हार्दिक शुभेच्छाही दिले.
सोमवारी दुपारी 1 वाजता कोरचीतील लगान क्रिकेट ग्राऊंडवर शिवतेज क्रिकेट क्लबच्या वतीने भव्य टेनिस बॉल स्पर्धेचे शुभारंभ करण्यात आले या स्पर्धेतील कार्यक्रमाचे उदघाटक आनंद जुळा, सहउदघाटक पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल सूर्यवंशी,अध्यक्ष डॉ स्वप्नील राऊत,उपाध्यक्ष यु यु ढोक,छत्रपती बांगरे, प्रमुख अतिथी म्हणून तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष राहुल अंबादे,नरेश नैताम,सतीश नाटेकर,चेतन कराडे,गौरव कावळे,सोमलकर सर,स्वप्नील कराडे,मुनेश पारधी,प्रशांत कराडे, शुभम भैसारे आणि समस्त शिवतेज क्रिकेट क्लब चे सदस्य उपस्थित होते.
या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये सोमवार पर्यंत तालुका व तालुका बाहेरील पंधरा संघांनी भाग घेतले होते या स्पर्धेत प्रथम विजेत्या संघाला तीस हजार रुपये,द्वितीय वीस हजार रुपये,तृतीय दहा हजार रुपये रोख रक्कम देण्यात येणार आहे तसेच विजेत्याना आकर्षक चषकासह आकर्षक बक्षीसामध्ये मॅन ऑफ द सिरीज,उत्कृष्ट गोलंदाज,प्रथम हट्रिक विकेट,षटकार,चौकार,प्रथम शतक,अर्धशतक,उत्कृष्ट पंच,ग्राउंड स्टाफ टुर्नमेंट, बेस्ट समालोचक,उत्कृष्ठ झेल,विकेटकीपर,सलग ६ षटकार,६ चौकार,अंतिम सा. अर्धशतक,उत्कृष्ठ संघ अशा येणाऱ्या प्रत्येकाना एक हजार रोख बक्षीस सुद्धा दिला जाणार आहे.