पोंभूर्णा सचिन मडावी :- आजची राजकीय परिस्थिती पाहिली तर मोदीच्या काळात लाेकशाहीची प्रमुख चार मूल्ये धाेक्यात आली आहेत.
अवैज्ञानिक गोष्टीचा अवलंब करून देशाची लोकशाही खिळखिळी केली जात आहे.हिंदू राष्ट्र संकल्पनेचा जाहीर प्रचार करताना मनुस्मृतीच्या कायद्याचे उघडपणे समर्थन केले जात आहे.लोकशाही टिकविण्यासाठी जनता जागृक असणे आवश्यक असल्याचे राजकीय विश्लेषक व अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्रा. श्याम मानव यांनी दि.२९ फेब्रुवारी गुरूवारला सायंकाळी ६ वाजता पोंभूर्णा येथील वनविभागाच्या विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगत होते.
विविध सामाजिक संघटना कृती समिती पोंभूर्णा द्वारा आयोजित भारतीय संविधान लोकशाही पुढील आव्हाने या विषयावर आयोजित २५ वे जाहीर व्याख्यान कार्यक्रमाच्या निमित्ताने पोंभूर्ण्यात आले असता पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
लाेकशाहीतील समता, बंधुता, न्याय व अभिव्यक्ती ही प्रमुख चार मूल्ये सात्यत्याने पायदळी तुडविली जात आहेत.मागिल दहा वर्षांत प्रशासकीय यंत्रणा ही केवळ राजकीय पक्षासाठी काम करताना दिसत आहे. विषमतेची दरी सातत्याने वाढत आहे. दाेन धर्मांमध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचे काम राज्यकर्त्यांकडून केले जात आहे.रिझर्व्हेशन संपवण्यात येत आहे.खाजगीकरणाच्या नावाखाली अख्खा देश भांडवलदारांना बहाल करण्यात आला आहे.सरकारी नाेकऱ्या संपुष्टात आणून आरक्षणातून मिळणारी समना संधीदेखील हिरावून घेतली जात आहे.मोदी हिटलरच्या मार्गाने चालत आहेत.गांधी नेहरूच काॅंग्रेस ने जे चार मुल्ये जपण्याचा काम केला ते चार मुल्ये मोदींच्या काळात संपलेली आहे.हिंदू राष्ट्र संकल्पनेचा जाहीर प्रचार करताना मनुस्मृतीच्या कायद्याचे उघडपणे समर्थन केले जात आहे.आताच्या राज्यकर्त्यांनी आणीबाणी पेक्षाही भयावह स्थिती निर्माण केली आहे. आणीबाणीच्या काळात किमान ताकदीने विरोधात बोलता येत होते. आता ती सोय राहिलेली नाही.असेही ते यावेळी बोलले.
धीरेंद्रकुमार शास्त्रीसारख्या बच्चा बाबाबुवांना सत्ताधाऱ्यांकडून संरक्षण दिले जात आहे.नागपूरात अंनिसने उघड आव्हान केल्यानंतर धीरेंद्रकुमार शास्त्री नागपूरमधून पळून जातो.मात्र भाजपाकडून याच बागेश्वरधाम बाबाला संपूर्ण महाराष्ट्रात फिरवून त्याचा दरबार भरविला जातो.यातून आपण कुठल्या दिशेला जात आहोत याचा अंदाज येतो.त्यामुळेच ४१ वर्षांनंतर सामाजिक क्षेत्रात काम करताना राजकीय भूमिका घेण्याची वेळ आज आली आहे असे प्रा.श्याम मानव यांनी सांगितले.मोदी हे अर्धवट निर्णय घेणारे पंतप्रधान असल्याची टिका करतांनाच २०२४ मध्ये मोदीला हाकलून लावणे काळाची गरज झाली आहे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी पत्रकार परिषदेला अंनिसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुरेश झुरमुरे, भगवान खराते यांची उपस्थिती होती.