गोंडपिपरी :- तालुक्यातील विविध पक्षात काम करणार्या कार्यकर्त्यांनी राजुरा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून राजुरा येथील जनसंपर्क कार्यालयात आ.धोटे यांच्या हस्ते काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
पक्षप्रवेश करणाऱ्यांच्या यादीत सुरेखा ऋषी मडावी,निर्मला मडावी,विमल महादेव शेडमाके,उषा प्रभाकर आलाम,उषा संतोष मडावी,अलका पांडुरंग मडावी,ललिता रवींद्र परचाके,आशा महादेव आत्राम,बाली मडावी,मिराबाई सिडाम,अलका आत्राम,रत्नमाला कुळसंगे,रवींद्र परचाके,चैत्राम मडावी,परशुराम कुळमेथे,अक्षय मेश्राम,सागर आत्राम,प्रदीप गेडाम,श्रीकांत मडावी,खुशाल कातलाम,गोपाल कुलमेथे,श्रीकांत ऊरवेते,चंद्रकांत गेडाम,संदीप बंडु मडावी इत्यादी महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.सर्वांना काँग्रेस पक्षाचे दुपट्टे देऊन आ.धोटे यांनी पक्ष प्रवेश दिला.यावेळी गोंडपिपरीच्या नगराध्यक्ष सविता कुळमेथे,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल झाडे,काँग्रेसच्या अनुसूचित जमाती विभागाचे तालुका अध्यक्ष बबलु कुळमेथे यासह अनेक पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.